पनवेल विसर्जन घाटावर अपघात, विसर्जनासाठी आलेले ११ भाविक शॉक लागून जखमी
By वैभव गायकर | Updated: September 9, 2022 22:23 IST2022-09-09T22:19:58+5:302022-09-09T22:23:55+5:30
जखमींना रूग्णालयात करण्यात आलं दाखल.

पनवेल विसर्जन घाटावर अपघात, विसर्जनासाठी आलेले ११ भाविक शॉक लागून जखमी
पनवेल:पनवेल शहरात पनवेल कोळीवाडा येथे गणेश विसर्जन करत असताना शॉर्टसर्किट होऊन 11 जण जखमी झाल्याची घटना घडली. शुक्रवार सायंकाळी 7.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीना पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालय, लाईफ लाईन रुग्णालय आणि पटवर्धन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
11 पैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जनरेटर मधून हायमास्कला जोडलेल्या वीजवाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक स्वरूपाची माहीती आहे.
घटनेची माहिती पालिका, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून अनंत चतुर्दशीच्या या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचे म्हटले जात आहे.