वर्षभरात अमली पदार्थांचे ४४ तस्कर ताब्यात

By Admin | Updated: October 1, 2015 01:51 IST2015-10-01T01:51:39+5:302015-10-01T01:51:39+5:30

गेल्या वर्षभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासंबंधी ३० गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये ४४ आरापींना अटक केली आहे

Accepts 44 smugglers of substance in the year | वर्षभरात अमली पदार्थांचे ४४ तस्कर ताब्यात

वर्षभरात अमली पदार्थांचे ४४ तस्कर ताब्यात

जितेंद्र कालेकर, ठाणे
गेल्या वर्षभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासंबंधी ३० गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये ४४ आरापींना अटक केली आहे. एकट्या कळवा आणि मुंब्रा परिसरातून जून २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत २० गुन्हे दाखल झाले आहेत. यात ३४ जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली. केवळ मुलेच नव्हे तर मुलींनाही या एमडीचे प्रलोभन दाखवून त्यांना या जाळ्यात ओढले जात आहे. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच पालक आणि शिक्षकांनी अधिक जागृकता दाखविणे गरजेचे आहे.
पूर्वी एमडीचे सेवन करणाऱ्यांवर किंवा ती विकणाऱ्यांवर एनडीपीएस अर्थात (नार्कोटीक्स ड्रग्ज अ‍ॅन्ड सायकोट्रोपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट) अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होत नव्हती. गेल्या काही दिवसांमध्ये एमडीच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने तसेच त्याचे दुष्परिणामही तीव्र असल्याने त्याची विक्री करणाऱ्यांवर एनडीपीएस ची कारवाई होण्यासाठी मुंब्रा भागातून मोठी चळवळ उभी राहिली.
ठाणे पोलिसांनीही एमडीचा अंमली पदार्थांमध्ये समावेशाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचीच
परिणीती म्हणून २४ फेब्रुवारी
२०१५ रोजी एमडीचा
एनडीपीएस अ‍ॅक्टमध्ये समावेश करण्यात आला.
याअंतर्गत मुंब्रा भागातून हसन अपसर कुरेशी उर्फ अजीज सय्यद (४०) याच्यावर धर्माधिकारी यांच्या पथकाने राज्यात पहिलीच कारवाई
केली. पूर्वी अंमली पदार्थांमध्ये समावेश नसल्याने आरोपीला लवकर जामीन मिळायचा. त्यानंतर लगेच तो हाच ‘उद्योग’ करायचा. आता ५० ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात एमडी मिळाल्यावर व्यापारी मात्राचे प्रमाण गृहीत धरुन विक्रीसाठीची कारवाई केली जाते,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Accepts 44 smugglers of substance in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.