शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

एसीबीची धाड भासवून दरोडा टाकणाऱ्यांना अटक; ऐरोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 31, 2023 18:41 IST

निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई: निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार व लुटलेला २५ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे बनावट धाड टाकून हा गुन्हे केला होता. ऐरोली सेक्टर ६ येथे राहणाऱ्या कांतीलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २१ जुलैला दुपारी त्यांच्या घरी अज्ञात सहाजण आले होते. त्यांनी ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी हि कायदेशीर धाड असल्याचे भासवले होते.

यादरम्यान त्यांच्या टोळीचे काहीजण काही अंतरावरून भवतालच्या हालचाल लक्ष ठेवून होते. यादरम्यान घरात घुसलेल्या तोट्या एसीबीच्या पथकाने यादव यांच्या घरातून तब्बल ३४ लाख ७५ हजाराचा ऐवज एकत्र करून लुटला होता. दरम्यान एसीबीची धाड असल्याचेच समजून यादव हे देखील दोन दिवस शांत होते. मात्र त्यानंतर त्यांना संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राकेश पगारे, दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, टिकेकर आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती. 

त्याद्वारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रुपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फिकार शेख (४३), वसीम मुकादम (३९) व आयुब खान (५०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांना पाहिजे असलेल्या व्यक्तींनी तीन वेगवेगळ्या टोळीच्या व्यक्तींना एकत्र करून यादव यांच्या घरावर धाड टाकून लुटीचा बनाव रचला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व लुटीचा २५ लाखाचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. 

एकमेकांनाही अनोळखी अटक केलेले सर्वजण तीन वेगवेगळ्या गटातले आहेत. गुन्हा करताना ते घरात घुसले त्यावेळी ते एकमेकांना देखील अनोळखी होते. पाहिजे असलेल्या व्यक्तींनी हा कट रचुन त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले होते. 

टीप कोट्यवधींची, हाती लाखो. यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल २६ प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र ३४ लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती. 

तीन महिन्यांपासून तयारीयादव यांच्या घरावर छापा टाकण्याची तीन महिन्यांपासून गुन्हेगारांची तयारी सुरु होती. एप्रिल मध्ये देखील त्यांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता काही कारणाने तो रद्द केला होता. त्यानंतर २१ जुलैला त्यांनी नियोजनाप्रमाणे छापा टाकला होता. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईArrestअटक