अपहरण, विनयभंग करणा:या दुकलीला शिक्षा
By Admin | Updated: October 30, 2014 22:34 IST2014-10-30T22:34:13+5:302014-10-30T22:34:13+5:30
विनयभंग करणा:या राजू मौर्या आणि अफजल मुबारक या दोघांना ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी गुरुवारी साडे तीन वर्षाची शिक्षा ठोठावली.

अपहरण, विनयभंग करणा:या दुकलीला शिक्षा
ठाणो : शाळेतून घरी जाणा:या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणा:या राजू मौर्या आणि अफजल मुबारक या दोघांना ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी गुरुवारी साडे तीन वर्षाची शिक्षा ठोठावली.
दिवा, साबेगावातील अल्पवयीन मुलगी 4 फेब्रुवारी 2क्1क् ला शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गेटबाहेर आली असता तिघांनी तिला दमदाटी करून जबरदस्तीने रिक्षात बसवले. साबेगाव स्मशानभूमी परिसराजवळ नेऊन तिघांनी तिथे तिच्याशी ईल चाळे करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी मोटारसायकलवरून जाणा:या तरुणाला पाहून त्यांनी या मुलीला तेथेच सोडून पळ काढला. त्या दुचाकीस्वाराने तिला पुन्हा शाळेच्या गेटजवळ आणून सोडले. घरी गेल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकाराने संतापलेल्या वडील आणि काकांनी दुस:या दिवशीही ते येण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळेजवळ पाळत ठेवली. शाळा सुटल्यावर ती बाहेर आल्यावर दोघांनी तिच्या तोंडाला रूमाल बांधून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रय} केला असता त्यांना पकडून नागरिकांनी चोप दिला. हे प्रकरण ठाणो जिल्हा न्यायाधीश वाघवसे यांच्यासमोर आले असता त्यांनी आज ही शिक्षा ठोठावली.