नेरुळ येथे रेल्वे मार्गाशेजारील गवताला लागली आग

By योगेश पिंगळे | Updated: June 7, 2023 12:41 IST2023-06-07T12:40:51+5:302023-06-07T12:41:23+5:30

हार्बर मार्गांवरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले

A fire broke out in the grass next to the railway line in Nerul | नेरुळ येथे रेल्वे मार्गाशेजारील गवताला लागली आग

नेरुळ येथे रेल्वे मार्गाशेजारील गवताला लागली आग

नवी मुंबई : नेरुळ आणि जुईनगर रेल्वे स्थानाकादरम्यान राजीव गांधी उड्डाणपुलाखाली नेरुळहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गाशेजारील सुकलेल्या गवताला बुधवारी सकाळी आग लागली. अगीची तीव्रता जास्त असल्याने सीएसटी आणी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळ थांबल्या होत्या.

रेल्वेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यावर रेल्वे सुरळीत सुरु झाली. सकाळी सुमारे २० मिनिटे विलंब झाल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. अगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरु असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी  शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

Web Title: A fire broke out in the grass next to the railway line in Nerul