मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:52 IST2020-03-01T04:51:02+5:302020-03-01T04:52:32+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ९२. ५७ टक्के मतदान झाले आहे.

90% voting for Mumbai Market Committee elections | मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ९२. ५७ टक्के मतदान झाले आहे. ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून, २ मार्चला बाजार समिती मुख्यालय आवारामध्ये मतमोजणी होणार आहे.
राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यासाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचा प्रयोग या निवडणुकीमध्येही राबविण्यात आला असून काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापने पॅनल तयार केले होते. भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर गर्दी दिसू लागली होती. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झाले असून, व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झाले आहे. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झाले आहे.
>मतदारांची आकडेवारी
विभाग मतांची
टक्केवारी
अमरावती विभाग ९९
औरंगाबाद विभाग ९८.७४
कोकण ९९.६४
पुणे ९९
नाशिक ९८.२३
नागपूर ९५.५९
व्यापारी मतदारसंघ ८७.२१
>मतदारसंघनिहाय उमेदवारांची
संख्या पुढीलप्रमाणे-
मतदारसंघ उमेदवार
औरंगाबाद ११
नागपूर ०७
अमरावती ०७
पुणे ०५
कोकण ०५
नाशिक ०८
मतदारसंघ उमेदवार
कामगार बिनविरोध
फळ मार्केट बिनविरोध
कांदा मार्केट ०३
भाजी मार्केट ०४
धान्य मार्केट ०३
मसाला मार्केट ०३
>मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, मसाला, धान्य व भाजी मार्केटमध्ये मतदानकेंद्र तयार करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहा महसूल विभागातील मतपेट्याही रात्रीपर्यंत मुंबईत आणल्या जातील. २ मार्चला बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मतमोजणी होईल.

Web Title: 90% voting for Mumbai Market Committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.