शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८३८ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:39 IST

प्रशासनाची जय्यत तयारी; दिव्यांग नागरिकांसाठी १२ सुविधा कक्ष

नवी मुंबई : निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात १२७ इमारतींमध्ये तब्बल ८३८ मतदान केंद्रे असून प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी १२ ठिकाणी सुविधा कक्ष निर्माण करणार असून दिव्यांग मित्र नावाने समन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक गोष्टीचा नियमित आढावाही घेतला जात आहे. ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये ७२ इमारतींमध्ये ४५२ मतदान केंद्रे असून अभय करगुटकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. बेलापूर मतदारसंघामध्ये ५५ इमारतींमध्ये ३८६ मतदान केंद्रे असून रूपाली भालके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शहरामध्ये ५३७ दिव्यांग मतदार आहेत. त्या सर्वांना विनाअडथळा मतदान करता यावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्रे आहेत; परंतु तेथे लिफ्टची सुविधा नाही अशा इमारतींमध्ये डोलीची व ती उचलण्यासाठी स्वयंसेवकांची सोय केली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेकरिता विशेष कक्ष स्थापित करण्यात येणार असून कोपरखैरणे,घणसोली, ऐरोली, दिघा, तुर्भे, बेलापूर, नेरूळ व वाशी विभाग कार्यालय परिसरामध्ये रिक्षांचीही सोय केली आहे. शहरामध्ये १२ सुविधा कक्ष असून तेथे दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. प्रत्येक ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. दिव्यांग मित्र त्यांच्या क्षेत्रामधील मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी व पुन्हा घरी सोडण्यासाठीची व्यवस्था आहे.दिव्यांगांप्रमाणे लहान मुले असणाऱ्या महिलांनाही सुलभपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र असलेल्या सर्व इमारतींमध्ये बालसंगोपन केंद्र स्वरूपातील पाळणाघर स्थापित करण्यात येणार आहेत. त्यासाठी बालवाडी शिक्षिका व लिंकवर्कर यांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली ऐरोलीसाठी संध्या अंबादे व बेलापूरसाठी चंद्रकांत तायडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.सखी मतदान केंद्रशहरामधील एका मतदान केंद्रावर पूर्णपणे महिला अधिकारी कार्यरत असणार आहेत. या सखी मतदान केंद्रामध्ये केंद्र अध्यक्षापासून शिपाईपर्यंत सर्व कामकाज महिला सांभाळणार आहेत. याशिवाय दोन्ही मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी आदर्श केंद्रे स्थापित केली जाणार असून तेथे रांगोळी काढली जाणार असणार असून मतदारांचे विशेष स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई