२५ टक्के आरक्षणातून ८२ विद्यार्थी वंचित

By Admin | Updated: August 31, 2016 03:18 IST2016-08-31T03:18:28+5:302016-08-31T03:18:28+5:30

शासनाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या खासगी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमधून अनुसूचित जाती आणि दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश मिळावा

82 percent deprived of 25 percent reservation | २५ टक्के आरक्षणातून ८२ विद्यार्थी वंचित

२५ टक्के आरक्षणातून ८२ विद्यार्थी वंचित

सिकंदर अनवारे,  दासगाव
शासनाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या खासगी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमधून अनुसूचित जाती आणि दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश मिळावा याकरिता शाळांच्या एकूण संख्येपैकी २५ टक्के आरक्षणाची योजना अमलात आणली. या वर्षीपासून या योजनेतून लाभ घेण्याकरिता आॅनलाइन प्रक्रियेद्वारे स्वत: पालकांनी अर्ज दाखल करावयाचे होते. मात्र सर्वच पालकांपर्यंत हा संदेश न गेल्याने आणि खासगी संस्थांनी आदेश निघताच हाताला घडी घालून बसण्याचा प्रकार केला. यामुळे महाड तालुक्यातील ८२ जागा रिक्त आहेत, याबाबतची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
शासनाच्या सर्व योजना या शाळांमार्फतच राबविल्या जातात. मात्र या वर्षीपासून २५ टक्के आरक्षण ही योजना आॅनलाइन करण्यात आली आहे. खासगी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या तसेच आर्थिक दुर्बल घटक, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळावा याकरिता ही योजना २०१२ मध्ये सुरू के ली. प्रतिवर्षी शाळांकडून हे प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाकडे पाठवले जात होते. मात्र यावर्षी शासनाने यात बदल करून आॅनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. पालकांनी स्वत: हे अर्ज दाखल करावयाचे आहेत. मात्र अनेक पालकांपर्यंत हा संदेश न गेल्याने तसेच आॅनलाइन प्रक्रियेबद्दल माहिती नसल्याचे अर्ज चुकीचे जाणे, अर्ज सादर न होणे, अर्जच न भरणे असे प्रकार घडले. यामुळे महाड तालुक्यात या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. शासनाकडून पैसे उशिराने मिळेल या शंकेतून अनेक शाळांनी पालकांनी अर्ज दाखल करावयाचे असा आदेश निघताच यातून सुटकेचा नि:श्वास सोडत तोंड बंद ठेवण्याचा प्रकार केला आहे. यामुळे महाड तालुक्यात २५ टक्के आरक्षणातून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.
खासगी संस्था चालकांकडून योजना सुरू झाल्यापासून असाच प्रकार सुरू आहे. महाड पंचायत समिती शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार प्रतिवर्षी शाळांकडून वंचित घटक उपलब्ध नाहीत, अर्ज प्राप्त झाले नाहीत अशी कारणे पुढे केली जात आहेत. प्रत्यक्षात आजही या शाळांमधून वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुले शिक्षण घेत आहेत.

नऊ शाळांचा योजनेत समावेश : महाड तालुक्यात या योजनेमध्ये ९ शाळा बसतात. यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीची दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा, समर्थ रामदास विद्यालय, एमआयडीसी, एस. एस. कदम इंग्रजी माध्यम मराठी शाळा बिरवाडी, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टची इंग्लिश मिडियम स्कूल चांभारखिंड, धर्मवीर दिघे विद्यालय बिरवाडी, मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचिंदे, संस्कारधाम विद्यालय इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक शाळा खरवली, श्रीगणेशनाथ महाराज संस्थान न्यू इंग्लिश स्कूल पडवी, झोलाई इंग्लिश स्कूल विन्हेरे या शाळांचा समावेश होतो.

Web Title: 82 percent deprived of 25 percent reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.