ठाण्यात ज्वेलर्समधून ८० हजारांची चोरी

By Admin | Updated: September 29, 2015 23:43 IST2015-09-29T23:43:48+5:302015-09-29T23:43:48+5:30

शहरातील ब्रह्मांड परिसरातील ‘पायल ज्वेलर्स’च्या दुकानातून ८८ हजारांचे सोनेचांदीचे दागिने चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

80 thousand stolen from Thane jewelers | ठाण्यात ज्वेलर्समधून ८० हजारांची चोरी

ठाण्यात ज्वेलर्समधून ८० हजारांची चोरी

ठाणे : शहरातील ब्रह्मांड परिसरातील ‘पायल ज्वेलर्स’च्या दुकानातून ८८ हजारांचे सोनेचांदीचे दागिने चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या दुकानाच्या दक्षिण बाजूकडील दुकान क्र. चारच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात शिरकाव केला. दुसऱ्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील काउंटर आणि शोकेसमधील प्रत्येकी एक हजाराच्या चार चांदीच्या फ्रेम, ४५ हजारांचे दोन ते तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, नऊ हजारांची अर्धा किलो चांदी, २५ हजारांची सीसीटीव्ही यंत्रणा आणि पाटल्या असा ८८ हजारांचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना २६ सप्टेंबरच्या रात्री ९ ते २७ सप्टेंबरच्या सकाळी ९ वा.च्या दरम्यान घडली. सहायक पोलीस निरीक्षक आर.के. धामणे तपास करीत आहेत.

Web Title: 80 thousand stolen from Thane jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.