दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना
By वैभव गायकर | Updated: August 6, 2023 09:27 IST2023-08-06T09:27:28+5:302023-08-06T09:27:40+5:30
नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे.

दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना
पनवेल: तळोजा एमआयडीसीमधून वाहणारी कासाडी नदीमधील रासायनिक केमिकल मिश्रित पाणी पिल्याने आठ बकऱ्या मृत्युमुखी पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. प्रदूषणावरून स्थानिक माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे.येथील प्रदूषण रोखण्यास अधिकारी तसेच तलोजा एमआयडीसी व पनवेल महानगरपालिका जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडल्यामुळे अनेक वर्षांपासून पारंपरिक गणपती विसर्जनाला देखील अडथळे येत आहेत.