पेणमध्ये ७७ टक्के मतदान
By Admin | Updated: October 28, 2015 23:30 IST2015-10-28T23:30:56+5:302015-10-28T23:30:56+5:30
पेण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून वाक्रुळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली

पेणमध्ये ७७ टक्के मतदान
पेण : पेण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून वाक्रुळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर उर्वरित कामार्ली, आंबेघर, खारपाले व जोहे ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले. चार ग्रामपंचायतींच्या २२ जागांसाठी ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १० मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने मतदानाची व्यवस्था केली होती. एकूण ७ हजार १९४ मतदारांपैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५,०८० मतदारांनी आपला हक्क बजावला असून एकूण ७०.६ टक्के मतदान झाले. उर्वरित वेळात ७७ टक्के मतदानाची शक्यता वर्तविण्यात आली.
कामार्ली ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी सायं. ४ वाजेपर्यंत १,११५ मतदारांनी हक्क बजावला. त्यांची टक्केवारी ५५.५ टक्के, आंबेघर ५ जागांसाठी ९६९ मतदारांनी मतदान केले. त्यांची टक्केवारी ८५ भरली. खारपाले ग्रा.पं.साठी ७३.६ टक्के मतदान झाले. जोहे ग्रामपंचायतीच्या ५ जागांसाठी ७०.६ टक्के मतदान झाले.(वार्ताहर)
१नागोठणे : पळस, कोंडगाव, वरवठणे, ऐनघर आदी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बुधवारी पार पडली. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर साठ टक्के मतदान झाले होते. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडी गावातील केंद्रावर परस्पर विरोधी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.२पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर आणि उपनिरीक्षक रामेश्वर दराडे व पोलीस पथक तेथे तातडीने दाखल झाल्याने तणाव निवळला गेला. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अनेक दिग्गज उमेदवार उभे असून, मतदान प्रक्रि येनंतर त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ३विभागात पळस ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ जागा असून अनुसूचित जमातीच्या महिला वर्गासाठी असणाऱ्या जागेतून एक महिला उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आली असल्याने इतर आठ जागांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले.
म्हसळयात ५८.७८ टक्के
म्हासळा : तालुक्यातील पाभरे, वावे या दोन ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले. एकूण २ हजार ५५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन ग्रामपंचायतीसाठी एकूण ५८.७८ टक्के मतदान झाले. यातील केलटे ग्रामपंचायत यापूवीच बिनविरोध झाली होती. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान झाली.