शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

नवी मुंबईत 57 हजार मुलांना पोलिओ लस, लसीकरणासाठी ७३७ बुथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:09 IST

Navi Mumbai ; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून सर्व मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी ७३७ बुथ तयार केले होते. यामध्ये १०१ अस्थायी व २८ मोबाइल बुथचाही समावेश आहे. तब्बल ५७ हजार मुलांना लस देण्यात आली असून, उर्वरित मुलांसाठी २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान घरोघरी जाऊन लस देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून सर्व मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शहरभर आवश्यक त्या ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी ६०८ स्थायी बुथ, तसेच रेल्वे स्टेशन, डेपो, टोल नाके येथेही नियोजन केले होते. दिवसभरात महापालिका क्षेत्रातील ५ वर्षांखालील ५७ हजार ७७६ बालकांनी पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ घेतला. लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाइज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल, याची काळजी घेऊन लांबूनच बाळाला स्पर्श न करता, तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही, याची दक्षता घेऊन लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्किंग करतानाह बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता, बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्किंग केले आहे. अशा प्रकारची काळजी सर्व बुथवर घेण्यात आली.

सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई व पर्यायाने राज्य आणि देश पोलिओमुक्त राहावा, या दृष्टीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महत्त्वाची असून, आरोग्यस्नेही नवी मुंबईकर नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. तथापि, ५ वर्षांखालील ज्या बालकांना लसीकरण झालेले नसेल, अशा बालकांच्या घरांना भेट देणाऱ्या महानगरपालिका स्वयंसेवकांना बालकांबाबत माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई