कोकण पदवीधर मतदार संघात ६४.१४ टक्के मतदान; १ जुलै रोजी नवी मुंबईत मतमोजणी
By कमलाकर कांबळे | Updated: June 27, 2024 15:56 IST2024-06-27T15:56:17+5:302024-06-27T15:56:35+5:30
सोमवार १ जुलै २०२४ रोजी नवी मुंबई नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्याने कळविले आहे.

कोकण पदवीधर मतदार संघात ६४.१४ टक्के मतदान; १ जुलै रोजी नवी मुंबईत मतमोजणी
नवी मुंबई: कोकण विभाग पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. यात एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील एकूण २ लाख २३ हजार ४०८ मतदारांपैकी त्यापैकी १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात १ लाख २० हजार ७७१ मतदारांनी नोंदणी केली त्यापैकी ७६ हजार ६४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शिक्षक मतदारसंघात नोंदणी असलेल्या १५ हजार ८३९ मतदारांपैकी १२ हजार ०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान सोमवार १ जुलै २०२४ रोजी नवी मुंबई नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्याने कळविले आहे.
मतदानाची अंतिम टक्केवारी
- कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ ६४.१४%
ठाणे- ५८.४२%,
पालघर- ६३.२३%,
रायगड- ६७.५९%,
रत्नागिरी-६९.१४%,
सिंधुदूर्ग-७९.८४%
एकूण- ६४.१४%
- मुंबई पदवीधर मतदारसंघ ५६.०१%
मुंबइ शहर- ५७.६८%
मुंबई उपनगर-५५.४४%
एकूण-५६.०१%
- मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%
मुंबइ शहर- ८०.१२%
मुंबई उपनगर-७४.९५%
एकूण-७५.७७%