शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

उरणच्या ५५७ नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई घ्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:21 IST

नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसरात मागील वर्षापासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र अद्यापही गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 उरण तालुक्यात भातपीक २४११ तर आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी बागायती पिके ७४.२९ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता अवेळी पाऊस, अतिवृष्टी आदी कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे.वर्ष  बाधीतांची संख्या  बाधीत क्षेत्र आर्थिक नुकसानऑगस्ट २०२२.  २४८. ५०.२२.  ६८२९९२.ऑक्टोंबर २०२२. ३०. ९.२७.  १२५१४५.मार्च २०२३. १८९. ३१.४५.  ९००९७५.-----------------------------------------------------------------एकूण-    ४६७.        ९०९४.         १७०९११२.-----------------------------------------------------------------यामध्ये मार्चनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणखी आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी ९० बागायतीदारांची भर पडली आहे.या ९० बागायतदारांचे  ७ लाख ६९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व मिळून  अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी उरण तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी दिली.

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाशी पत्र व्यवहार सुरू आहे. शासनाच्या  व्हेबपोर्टलवरही माहिती टाकण्यात आली आहे.यापुढे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम यांनी दिली. 

शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतिक्षा आहे.मात्र अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

मात्र  गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने  परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.