5,000 रिक्षांत लावले स्मार्ट आयडी

By Admin | Updated: September 19, 2014 02:56 IST2014-09-19T02:56:13+5:302014-09-19T02:56:13+5:30

वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘ट्रॅफीक स्मार्ट आयडी’ उपक्रमाचा पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या उपस्थितीत आरंभ झाला.

5,000 crores Smart ID | 5,000 रिक्षांत लावले स्मार्ट आयडी

5,000 रिक्षांत लावले स्मार्ट आयडी

ठाणो : रिक्षाप्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ठाणो शहर वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘ट्रॅफीक स्मार्ट आयडी’ उपक्रमाचा पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या उपस्थितीत आरंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्यात पाच हजार रिक्षांमध्ये हे ओळखपत्र बसवण्यात आले आहे. 
‘गेल्या काही वर्षात महिलांच्या बाबतीत वाढत असलेल्या गुन्ह्यांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मलाही रात्रीचा फेरफटका मारताना अशीच भीती वाटते,’ असे मत मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने व्यक्त केले. ‘वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षित असल्याची जाणीव होईल आणि आधार मिळेल,’ असेही त्या म्हणाल्या.
‘सुरक्षित वाहतूक संकल्पना आपल्याकडे खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीत अजूनही मुरलेली नाही. आपण परदेशातील योजना ऐकतो मात्र, प्रत्यक्षात काहीच करत नाही. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत टेक्नालॉजी नव्हती, त्यावेळीही सुरक्षित वाहतूक संकल्पना रुजली होती. आपल्या समाजात ही मानसिकता कधी येणार,’ असा सवाल पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी उपस्थित केला. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणो हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, परंतु समाजाचीही तितकीच जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  ‘ट्रॅफीक स्मार्ट आयडी’ या उपक्रमात नागरिकांना तत्काळ मदत करावी आणि जबाबदारी चोखपणो पार पाडावी, असे आदेशही त्यांनी यावेळी वाहतूक शाखेला दिले. 
रिक्षात प्रवाशांना सहज दिसेल अशा ठिकाणी हे ओळखपत्र बसविण्यात आले आहे.  (प्रतिनिधी)

 

Web Title: 5,000 crores Smart ID