शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात ४७२ कोटी खर्च करणार; एमएमआरडीएकडून प्रक्रिया सुरू

By नारायण जाधव | Updated: October 20, 2022 17:21 IST

ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोची कारशेड कशेळीतच

नवी मुंबई : ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रो-५ ची कोन एमआयडीसीनजीकच्या गोवे येथील १६ हेक्टर जागेवरील कारशेड आता कशेळी येथे बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, एमएमआरडीए पहिल्या टप्प्यात या कारशेडवर ४७२ कोटी रुपये खर्च करणार आहे.स्थानिकांच्या विरोधानंतरही याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेत मंजूर केला होता. त्यानंतर आता कशेळीतील कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामांसाठी एमएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबईसह ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ अंतर्गत विस्तारित २४.९ कि.मी.च्या मेट्रोमार्गाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालासही अखेर राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी तो तयार करून या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला होता. मात्र, मार्गास विलंब झाल्याने त्यात मोठी वाढणार आहे.

भिवंडीत मार्ग भूमिगत केल्याने खर्चात १७२७ कोटींनी वाढ

कारण यापूर्वी भिवंडीत हा मार्ग भूमिगत केल्याने ७३५ बांधकामे वाचून प्रकल्पाचा खर्च १७२७ कोटींनी वाढला आहे. यामुळे प्रकल्प पूर्ण होईस्तोवर एकूण खर्चात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या कामांचा आहे समावेश-

एमएमआरडीएने कशेळी कारशेड बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी जागेवर भराव टाकून त्या ठिकाणी स्टेबलिंग यार्ड, प्रशासकीय इमारत, वर्कशॉप, रस्ते, पूल आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. यासाठी पर्यावरण परवानगीही घ्यावी लागणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त यावर आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएNavi Mumbaiनवी मुंबई