दररोज ४०० किलो द्राक्षांची होतेय विक्री
By Admin | Updated: March 10, 2016 01:56 IST2016-03-10T01:56:29+5:302016-03-10T01:56:29+5:30
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांनाही कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल मिळावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा माल

दररोज ४०० किलो द्राक्षांची होतेय विक्री
जान्हवी मोर्ये, डोंबिवली
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांनाही कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल मिळावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीऐवजी थेट खुल्या बाजारात विकण्यास मुभा दिली आहे. पुण्यातील नारायण गावाचे शेतकरी रामचंद्र चव्हाण याच संधीचा फायदा घेत आहेत. ते डोंबिवलीत दिवसभरात त्यांच्या शेतातील ४०० किलो द्राक्षे विकतात. ग्राहकांनाही वाजवी किमतीत द्राक्षे मिळत असल्याने तेही समाधानी आहेत.
चव्हाण यांनी सात एकर शेतात द्राक्षाचे पीक घेतले आहे. ही द्राक्षे ते थेट डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील बाजारात २० दिवसांपासून विकत आहेत. ‘शेतकरी तुमच्या दारात’ या संकल्पने अंतर्गत ते पूर्वेत गणेश मंदिर परिसरात आणि पश्चिमेत सिंडीकेट बँकेजवळ टेम्पोतून द्राक्षाची विक्री करत आहेत. या टेम्पोवर द्राक्ष विक्रीसाठी त्यांनी चार कामगार ठेवले आहेत.
त्यापैकी मालविक्री करणारे विनोद डोंगरे यांनी सांगितले की, ‘दररोज आमच्याकडील चारशे किलो द्राक्षे संपतात. बाजारात जास्त दराने द्राक्षे विकली जातात. कोणी ८० रुपये तर कोणी दर्जानुसार १२० प्रति किलोने द्राक्षे विकतात. आम्ही ६० रुपये किलो दराने द्राक्षे विकतो. बाजारातील द्राक्षे पावडर टाकून पिकवली जातात. आम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेली द्राक्षे विकतो. या द्राक्षांमुळे त्यांच्या आरोग्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. शिवाय त्यांचे २० रुपयेही वाचतात.’