४०० एकर शेतीचे नुकसान
By Admin | Updated: October 28, 2015 23:29 IST2015-10-28T23:29:53+5:302015-10-28T23:29:53+5:30
धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते.

४०० एकर शेतीचे नुकसान
पेण : धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते. यंदा नवरात्री उत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेला आलेल्या भरतीमुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस व वादळीवाऱ्यांनी समुद्र खवळला होता, यामुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त लाटा उसळून धरमतर खाडी किनारचे संरक्षक बांध ओव्हरफ्लो होवून भरतीचे खारेपाणी थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहचले. याबरोबर कापलेल्या १५० एकर भातशेतीत तर २०० एकर उभ्या शेतीत असे एकूण ४०० एकर भातशेतीला भरतीचे पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने आपल्या प्रचंड मालवाहतूक करणाऱ्या बार्जेससाठी ड्रेझरने धरमतर खाडीचे उत्खनन केल्याने शेतीचे संरक्षण करणारे समुद्रतटीय बंधारे कमकुवत झाले. येणाऱ्या बार्जेसच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या लाटा थेट या बंधाऱ्यावर मोठा आघात करतात. कोजागिरी पौर्णिमेची भरती मोठी आल्याने मालवाहू बार्जेसच्या लाटांनी संरक्षक बंधारे ओव्हरफ्लो होवून सगळीकडून भरतीचे पाणी वेगाने थेट विठ्ठलवाडी गावापर्यंत पोहोचले.