पाठय़पुस्तके रद्दीत विकणारे भिवंडीचे 4 शिक्षक निलंबित
By Admin | Updated: September 19, 2014 23:12 IST2014-09-19T23:12:03+5:302014-09-19T23:12:03+5:30
भिवंडी मनपा शिक्षण मंडळात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्याथ्र्यासाठी आलेली पुस्तके रद्दीत विकल्याच्या आरोपावरून चार शिक्षकांना अखेर निलंबित करण्यात आले.

पाठय़पुस्तके रद्दीत विकणारे भिवंडीचे 4 शिक्षक निलंबित
भिवंडी : भिवंडी मनपा शिक्षण मंडळात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्याथ्र्यासाठी आलेली पुस्तके रद्दीत विकल्याच्या आरोपावरून चार शिक्षकांना अखेर निलंबित करण्यात आले. या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी मनपा शिक्षण मंडळाचे उपसभापती कामील कर्नाले यांनी पत्रद्वारे प्रशासन अधिका:याकडे केली होती.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी आलेली पाठय़पुस्तके रद्दीत विकण्याचा गंभीर गुन्हा शहरातील गैबीनगर येथील उर्दू शाळा क्र. 7क् व 34 मध्ये 9 सप्टेंबर रोजी घडला. या प्रकरणी मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी गजानन मंदाडे यांनी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. या घटनेमुळे मनपा शिक्षण मंडळाची बदनामी होत असून शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी नागरिकांची मागणी वाढल्याने त्यांनी उर्दू शाळा क्र. 7क् च्या मुख्याध्यापिका शेख शहनाज अख्तर मो. इसा, उपशिक्षक शेख अताऊर रहमान मजीद, शेख जकी अह.अ. वहाब आणि शाळा क्र. 34 चे मुख्याध्यापक अ. रऊफ अ. माजीद शेख या चार शिक्षकांना निलंबित केले आहे. या घटनेने मनपा शिक्षण मंडळाच्या शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.