शेकापचे ४ नगरसेवक भाजपवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 02:46 IST2020-08-22T02:46:25+5:302020-08-22T02:46:29+5:30

हरेश केणी यांच्यासोबत हरेश केणी यांचे बंधू दिनेश केणी यांनी हजारो समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला.

4 PWP corporators are BJP supporters | शेकापचे ४ नगरसेवक भाजपवासी

शेकापचे ४ नगरसेवक भाजपवासी

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत विरोधीपक्षात असलेल्या शेकापला पाच नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये पनवेल विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार असलेल्या हरेश केणी यांचा समावेश असल्याने शेकापसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
केणी यांना शेकापच्या मार्फत पनवेल महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेत्याचे आश्वासन शेकाप नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न केल्याने केणी हे शेकापमध्ये नाराज होते. पनवेल महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून केणी यांची ओळख आहे. हरेश केणी यांच्यासोबत हरेश केणी यांचे बंधू दिनेश केणी यांनी हजारो समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला.
या वेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 4 PWP corporators are BJP supporters