शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई

By नारायण जाधव | Updated: July 10, 2023 17:21 IST

मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक  झाली.

नवी मुंबई :- “एमएमआरडीए” तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळाली आहे त्याचं अनुषंगाने मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक  झाली.

यावेळी म्हात्रे यांनी सांगितले की, यासंदर्भात एमएमआरडीए ने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली अश्या एकूण 132 मच्छीमार बांधवाना व ज्या 82 मच्छीमार बांधवांना पहिला हप्ता प्राप्त झाला आहे त्यांनाही दुसरा हप्ता व तिसरा हप्ता अशी सर्वांना एक रकमी नुकसान भरपाई डी.बी.टी. द्वारे थेट बँक खात्यात जमा झाली आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी सदरची प्रक्रिया अपूर्ण आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून उर्वरित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देणार व  माझा कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली 4 वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली गाव येथील कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून माझ्या मच्छीमार कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे  कर्तव्य आहे. तसेच मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळाले असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, युवा महामंत्री दत्ता घंगाळे, डोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कोळी, फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस व असंख्य कोळी बांधव व महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे