शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत ४ गुन्हेगार, बांगलादेशी महिलेला बेड्या, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये केली धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:31 IST

वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या.

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली आहे.

कोपरखैरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडतात. गल्लीबोळात टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांची आपसात हाणामारी होत असते. यापैकी स्वत:ला भाई होऊ पाहणारे, चोऱ्या-घरफोड्या करणाऱ्यांना प्रतिबंध लवाण्यासाठी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री कोपरखैरणे पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. 

वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या. यातील २५ अधिकारी, १४० कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे, घणसोली परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला असता चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली. 

दाेन जणांनी काढला पळसलीम इमाम खान (२८), रिझवान सादिक कुरेशी (३२), अज्जू फ्रान्सिस (२७), साहिल अन्सारी (२२) व पॉपी मुल्ला (२०) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी तिघे खैरणे तर एक बोनकोडेचा राहणारा आहे. सलीम याच्यावर घरफोडीचे १७ गुन्हे दाखल आहेत. मात्र अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. तर साहिल याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाइल मिळून आले. खैरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला ही बांगलादेशी महिला मिळून आली असून तिचे दोन नातेवाईक अंधारात पळून गेले.

अधिकारी जखमीकोपरखैरणे सेक्टर ५ येथील मार्गाने वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पारसिक बँकेसमोर दुचाकीस्वार तरुणावर संशय आला. पाेलिसांना पाहून त्याने पळ काढला. औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला.  पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत ते जखमी झाले आणि संशयित आराेपीने पळ काढला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBangladeshबांगलादेश