शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

 बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार

By नारायण जाधव | Updated: June 27, 2023 18:41 IST

आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते.

नवी मुंबई : आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज सर्व सामान्य रुग्णांना व वैदकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे फायदा होणार आहे व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना व तरुणींना यांना मोठा लाभ मिळणार आहे. याच अनुषंगाने म्हात्रे यांनी मंगळवारी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गीकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्प, नवी मुंबईतील विविध समस्याबद्दल बैठक पार पडली. यावेळी म्हात्रे यांनी सांगितले की, सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचा पूर्ण प्रोजेक्ट प्लान तयार असून सदर प्रकल्प हा 8.40 एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे 819.30 कोटी खर्च येणार आहे. जर भूखंड हस्तांतरणानंतर महापालिकेला 3.5 COMMERCIAL FSI हा जर हस्तांतरित केला तर येणाऱ्या व्यावसायिकच्या उत्पन्नातून सदर हॉस्पिटलचा खर्च चालेल. यावर सदर व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदरचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले.

तसेच त्यापुढे म्हणाल्या की, गेली सतत 2 वर्षे पाठपुरावा करीत असलेले बेलापूर गावातील जो मोकळा भूखंड आहे त्याचा वापर हा गोडाऊन म्हणून वापर केला जातो तो भूखंड हा “खेळाचे मैदान” म्हणून सिडकोने घोषित करून तो नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करून लवकरात लवकर मैदान खुले करावे. तसेच ग्रोमा असोशियनच्या मार्केट 2 (धान्य बाजार) मधील व्यापारांच्या अडचणी, NRI वसाहतीतील क्लब हाउस व इतर समस्या, जुईनगर येथील गणपती मंदिराच्या भूखंडा संदर्भात व सानपाडा येथील सेक्टर – 24 मधील भूखंड क्र. डी-63  या भूखंडाचे सन 2004 च्या बाजारभावाप्रमाणे देण्यात यावे अश्या विविध समस्या म्हात्रे यांनी  दिग्गीकर यांच्या समोर मांडल्या.  यावर त्यांनी सकारत्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले.       

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई