शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पनवेलमधील ३४ शाळा धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:53 PM

पनवेल महापालिकेच्या स्थापनेला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे.

- वैभव गायकर पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांचा समावेश आहे. या शाळा अद्याप पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, पालिकेच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेने शाळांकडे दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या घडीला धोकादायक स्थितीतील शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डोंगरीसारख्या घटनेची पुनरावृत्ती पनवेलमध्ये झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत आहे.पनवेल महापालिकेने संबंधित शाळा हस्तांतराची मागणी जिल्हा परिषदेकडे केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेला शाळा हस्तांतराचा मोबदला हवा असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. मात्र, या सर्व प्रकरणात सर्वसामान्य विद्यार्थी भरडले जात आहेत.अनेक शाळा धोकादायक स्थितीत असून विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित आहेत. काही शाळांच्या इमारतीने चाळिशी ओलांडली आहे, तर काही १९६० च्या काळातील असून जीर्णावस्थेत आहेत.जिल्हा परिषदेमार्फत काही शाळांची तात्पुरती दुरुस्ती तर काही शाळांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेचे या शाळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५१ पैकी ३४ शाळांमध्ये दुरुस्तीची गरज आहे. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला शाळांच्या दुरुस्तीचा अहवाल सादर केला आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेला दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही. हस्तांतराच्या कचाट्यात शाळा सापडल्या असून अनेक शाळांमधे पावसामुळे गळती लागली आहे. भिंतींना ओल आले आहे. अशाच स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून छप्पर कोसळणे, भिंत पडणे अशा प्रकारचा धोका के व्हाही निर्माण होऊ शकतो.पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र लिहिले आहे.संबंधित शाळांची दुरुस्ती त्वरित हाती घेण्याची विनंती देशमुख यांनी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बुधवारी ्रपनवेल महापालिकेच्या महासभेत पालिका क्षेत्रातील धोकादायक शाळांच्या दुरुस्तीचा विषय समोर आला.महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या धोकादायक शाळांच्या विषयावर भाजप नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी जिल्हा परिषदेसोबत तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती.>५१ शाळांपैकी ३४ शाळांच्या दुरुस्तीची गरजपनवेल महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ५१ शाळांपैकी सध्याच्या घडीला ३४ शाळांमध्ये तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. अनेक शाळांना गळती लागली आहे तर काही शाळांचे छप्पर, भिंती पूर्णपणे जीर्ण झाल्या आहे..पनवेल महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर अद्याप पालिकेकडे झालेले नाही. शाळांची मालकी जिल्हा परिषदेकडेच आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करून संबंधित शाळांची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापनवेल क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीबाबत महापालिका व जिल्हा परिषदेसोबत पत्रव्यवहार केला आहे. सध्या अलिबागमध्ये बैठकीत असल्याने याबाबत फारसे बोलता येणार नाही.- डी.एन. तेटगुरे,गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती पनवेलजिल्हा परिषद दुर्लक्ष करीत असेल तर पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तांत्रिक अडचणी येत असतील तर पालिकेने महासभेत शाळा दुरुस्तीचा ठराव घ्यावा. शाळेत जाणारे विद्यार्थी हे पनवेल महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. त्यांच्या जीवास धोका असेल तरी लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.- हरेश केणी,नगरसेवक,पनवेल महापालिका