शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : Unpredictable पाकिस्तान! अमेरिकेकडून हरणाऱ्या शेजाऱ्यांनी टीम इंडियाला स्वस्तात All Out केले
2
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
3
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
4
PM Narendra Modi : मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ...
5
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
6
वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!
7
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
8
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
9
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
10
PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी
11
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
12
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
13
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
14
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
15
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
16
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
17
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
18
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
19
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
20
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक

पनवेल महापालिका क्षेत्रात ३३५ मोबाइल टॉवर अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:59 PM

पनवेल महापालिका क्षेत्रात अनधिकृत मोबाइल टॉवरचे पेव वाढले आहे.

वैभव गायकर पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात अनधिकृत मोबाइल टॉवरचे पेव वाढले आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून पालिकेने अशा अनधिकृत मोबाइल टॉवरवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ६७ मोबाइल टॉवर पालिकेने सिल केले आहेत. पालिकेची परवानगी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोबाइल टॉवरचालकांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेमार्फत देण्यात आली.महापालिकेने मोबाइल टॉवरसंदर्भात दर आकारण्याचा ठराव १३ जानेवारी २०१८ रोजी निश्चित केला आहे. या वेळी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पालिका क्षेत्रात सुमारे ३६३ मोबाइल टॉवर असल्याची माहिती पालिकेकडे उपलब्ध आहे. वर्षभरात या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचीही शक्यता आहे. मात्र, पालिकेकडून केवळ २८ मोबाइल टॉवरचालकांनी परवानगी घेतली आहे. उर्वरित सर्व मोबाइल टॉवर तीन वर्षांपासून अनधिकृतरीत्या सुरू आहेत.सध्याच्या घडीला पालिकेकडे उत्पनाचे स्रोत म्हणून केवळ मालमत्ता कर आकारणी केली जाते. याव्यतिरिक्त महापालिकेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना विनापरवाना मोबाइल टॉवरमुळे प्रत्येक वर्षाला पालिकेचा सुमारे पाच कोटींचा कर बुडत आहे. नामांकित कंपन्यांचे मोबाइल टॉवर उभारून सोसायटी आपल्या इमारतीचा डागडुजीचा खर्च वसूल करत असल्या तरी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याने नजीकच्या काळात अनधिकृत मोबाइल टॉवरविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने सुरू आहेत. या वेळी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाच्या तोंडी परवानगीने हे अनधिकृत मोबाइल टॉवर सुरू आहेत. या परवानगी देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही झाल्याची चर्चा आहे.पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पालिका क्षेत्रात ३६३ मोबाइल टॉवर असल्याची नोंद आहे. वर्षभरात हा आकडा ५०० पेक्षा जास्त झाला आहे. पालिकेकडे २८ अधिकृत टॉवर वगळता केवळ दहा मोबाइल टॉवर कंपन्यांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. उर्वरित मोबाइल टॉवर अद्यापही पालिकेचा कर बुडवत आहेत. पालिका स्थापनेपासून तीन वर्षांत अनधिकृत मोबाइल टॉवर उभारून पालिकेचा १५ कोटींपेक्षा जास्त कर बुडाल्याने पालिकेने संबंधित अनधिकृत मोबाइल टॉवरधारकांना शेवटचे अल्टिमेटम दिले आहे.>ग्रामीण भागात मोबाइल टॉवरचा सुळसुळाटपनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने सुरू आहेत. तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाच्या तोंडी परवानगीने हे अनधिकृत मोबाइल टॉवर सुरू आहेत. या परवानग्या देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही झाल्याची चर्चा आहे.>कारवाई करून मोबाइल कंपन्यांची सेवा बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही. पालिकेच्या धोरणानुसार संबंधित मोबाइल टॉवरचालकांनी रीतसर पालिकेचीही परवानगी घ्यावी. याकरिता पालिकेच्या माध्यमातूनही संबंधितांना सहकार्य केले जाईल. मात्र, पालिकेचा कर बुडविणाºया मोबाइल टॉवरचालकांवर कारवाई केली जाईल.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका