उल्हासनगरात पाण्याची ३० टक्के गळती
By Admin | Updated: December 22, 2015 00:30 IST2015-12-22T00:30:39+5:302015-12-22T00:30:39+5:30
शहराला दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात इमारत व झोपडपट्टी असा भेदभाव सुरू असून पाणीगळतीचे प्रमाण ३० टक्के आहे

उल्हासनगरात पाण्याची ३० टक्के गळती
सदानंद नाईक, उल्हासनगर
शहराला दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होऊनही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
यात इमारत व झोपडपट्टी असा भेदभाव सुरू असून पाणीगळतीचे प्रमाण ३० टक्के आहे. २८७
कोटींची वितरण योजना राबवूनही जलवाहिन्या कुचकामी ठरल्याचा आरोप होत आहे.
उल्हासनगरात पूर्व व पश्चिम भागांतील असमतोल पाणीपुरवठ्याचा भेदभाव उफाळून आला आहे. तसेच इमारती व झोपडपट्टी असा वाद उभा ठाकला आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम विभागाची लोकसंख्या कमीअधिक प्रमाणात सारखी असून पूर्वेला ३७ तर पश्चिमेला ८७ एमएलडी पाणीपुरवठा कसा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ८७ एमएलडी पाणीपुरवठ्यातून पूर्वेतील मद्रासीपाडा, मराठा सेक्शन व रेल्वे स्टेशन भागात पाणीपुरवठा केला जातो.
दहाचाळ, महात्मा फुलेनगर, अचानकनगर, सिद्धार्थ स्नेह मंडळ परिसर, कुर्ला कॅम्प, भरतनगर, साईनगर, राहुलनगर, ओटी सेक्शन, भीमनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर, अयोध्यानगर, तानाजीनगर, समतानगर, सुभाषनगर, करोतियानगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकरनगर, संतोषनगर आदी झोपडपट्टी भागाला आठवड्यातून ५ दिवस तेही १५ ते २० मिनिटे तर उच्चवर्गीय भागात दिवसातून ३ ते ४ तास पाणीपुरवठा होतो.