खोपोलीत अवतरले ३ हजार ७२१ गांधीजी
By Admin | Updated: October 3, 2015 03:21 IST2015-10-03T03:21:41+5:302015-10-03T03:21:41+5:30
गांधी जयंतीनिमित्त खोपोलीकरांनी महात्मा गांधींना अनोखी आदरांजली वाहिली. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी म्हणून खोपोली लायन्स क्लबने

खोपोलीत अवतरले ३ हजार ७२१ गांधीजी
खालापूर : गांधी जयंतीनिमित्त खोपोलीकरांनी महात्मा गांधींना अनोखी आदरांजली वाहिली. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी म्हणून खोपोली लायन्स क्लबने ‘मी गांधी अहिंसा व स्वच्छता अभियानाचे’ आयोजन केले होते. यावेळी ३ हजार ७२१ गांधीजी पंत पाटणकर
क्रीडांगणावर अवतरले होते. या अनोख्या विश्वविक्रमी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो खोपोलीकरांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधी जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब आॅफ खोपोलीच्या वतीने विश्वविक्र माचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘मी गांधी अहिंसा व स्वच्छता अभियाना’चे आयोजन खोपोलीतील पंत पाटणकर क्रीडांगणावर करण्यात आले होते.
या अभियानात खोपोलीतील जनता विद्यालय, शिशुमंदिर, वसंत देशमुख मेमोरियल, कारमेल यांच्यासह परिसरातील शाळांमधील ३ हजार ७२१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या प्रार्थना व भजने ऐकविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना अहिंसा व स्वच्छतेची शपथही देण्यात आली. एकाच वेळी इतके गांधीजी अवतरल्याने या उपक्रमाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
दरम्यान यावेळी या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आ. सुरेश लाड, विधान परिषदेचे सदस्य आ. जयंत पाटील, नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, उपनगराध्यक्ष रमेश जाधव, पोलीस उपअधीक्षक बी. पी. कल्लुरकर, विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे, कुलदीपक शेंडे, श्याम मालपाणी, सुभाष भलाबल, हनुमान अगरवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष शेखर जांभळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)