एनएमएमटीच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बसेस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 02:27 IST2019-12-22T02:26:51+5:302019-12-22T02:27:04+5:30
संडे अँकर । प्रस्ताव सर्वसाधारण सभेत : पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेचा निर्णय

एनएमएमटीच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बसेस!
इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी सुरुवातीला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर, ती मुदत १५ डिसेंबरपर्यंत करण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २० डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे, परंतु सभा तहकूब ठेवल्यामुळे तो मंजूर होऊ शकलेला नाही. मुदत संपली असली, तर पुन्हा १५ जानेवारीपर्यंत वाढीव मुदत मिळणार असून, त्या मुदतीमध्ये बस खरेदीच्या प्रस्तावास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून, एकूण बसेसची संख्या १३० होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला असून, पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालय यांनी इलेक्ट्रिक बसेस खरेदी बाबत प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यापूर्वी फेम १ ही योजना राबविली होती. त्या योजनेंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने ३० बसेस घेतल्या आहेत. आता फेम २ योजनेंतर्गत अजून १०० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत.
च्उर्वरित रक्कम ठेकेदाराने भरायची असून, त्याला प्रति किलोमीटर प्रमाणे उत्पन्नातून काही रक्कम महापालिका देणार आहे.
बसेससाठी चार्जिंगची सुविधा डेपोमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. बसेसच्या देखभालीचा खर्चही ठेकेदाराला करावा लागणार आहे. यामुळे इंधनावर होणारा खर्च व त्यामुळे होणारे प्रदूषण कमी होणार आहे.
इलेक्ट्रिक बसेसमुळे इंधनात बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. २० डिसेंबरच्या सभेत हा विषय तत्काळ मंजूर होणे आवश्यक होते, परंतु तो होऊ शकला नाही. लवकरात लवकर या विषयाला मंजुरी मिळावी, ही अपेक्षा.
- सुधीर पवार,
परिवहन सदस्य,
काँगे्रस