महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त 27 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

By नामदेव मोरे | Updated: October 12, 2022 15:21 IST2022-10-12T15:20:27+5:302022-10-12T15:21:31+5:30

आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी ही माहिती दिली.

27 000 grant announced to navi mumbai municipal corporation officers employees on the occasion of diwali | महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त 27 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त 27 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने सन 2021-22 वर्षाकरिता  महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना 27 हजार तसेच करार  स्वरूपातील कर्मचारी यांना  21 हजार आणि आशा वर्कर यांना 11 हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी ही माहिती दिली.

यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 27 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना 21 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे 21 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना 11 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

अशाप्रकारे एकूण 4454 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना दिलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला असून या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Web Title: 27 000 grant announced to navi mumbai municipal corporation officers employees on the occasion of diwali