शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:31 IST

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. सिडको व महानगरपालिकेने आतापर्यंत ११८ जलकुंभ बांधले असून, त्यापैकी ९४ सद्यस्थितीमध्ये वापरामध्ये आहेत. शहरातील २५ जलकुंभ धोकादायक असून, तीन निष्कासित करण्यात आले आहेत.नवी मुंबई शहर बसविताना शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने शहरातील विविध नोडमध्ये २८ उच्चस्तरीय आणि ४६ भूस्तरीय जलकुंभ बांधले होते. महापालिकेच्या स्थापनेनंतर सर्वच जलकुंभ सिडकोने महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. महानगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. शहरातील नागरिकांना कराव्या लागणाऱ्या पाण्याची साठवणूक या जलकुंभांमध्ये केली जाते. आवश्यकतेनुसार महापालिकेने शहरात सुमारे १९ उच्चस्तरीय आणि २५ भूस्तरीय जलकुंभ बांधले आहेत. यामुळे एकूण जलकुंभांची संख्या ११८ झाली आहे. नव्याने ९ उच्चस्तरीय आणि १० भूस्तरीय जलकुंभ बांधण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी महासभेने मंजुरीही दिली असून, दिघा भागात एक उच्चस्तरीय आणि १ भूस्तरीय जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या जलकुंभांचे आयुष्य संपले असून, अनेक जलकुंभांना तडे गेले आहेत. जलकुंभांच्या संरक्षक भिंतींची दुरवस्था झाली असून, जलकुंभांच्या आवारात स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळेही जलकुंभांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक जलकुंभ आणि त्यांची सुरक्षा याबाबत नगरसेवकांनी अनेक वेळा महासभा आणि स्थायी समिती सभेत चर्चादेखील केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. महापालिकेने १६ उच्चस्तरीय आणि १६ भूस्तरीय जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिटही केले असून, यामध्ये सात उच्चस्तरीय आणि १८ भूस्तरीय जलकुंभ धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. वापरात नसलेल्या जलकुंभांची संख्या सुमारे १८ असून त्यापैकी तीन उच्चस्तरीय जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहेत. धोकादायक झालेल्या जलकुंभांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असून, पर्यायी सुविधा नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आयआयटीच्या माध्यमातून जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करून घेत असून, आलेल्या अहवालाप्रमाणे दुरुस्ती व इतर कामे केली जात आहेत. धोकादायक ठरविलेल्या जलकुंभांच्या जागेवर नवीन जलकुंभ उभारण्यास सुरुवात केली आहे; काही ठिकाणी निविदा प्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे काम रखडले आहे.३२ जलकुंभांचे लेखापरीक्षणमहापालिकेने आतापर्यंत ३२ जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले आहे. यामध्ये १६ उच्चस्तरीय व १६ भूस्तरीय जलकुंभांचा समावेश आहे.आवश्यकतेप्रमाणे जुन्या जलकुंभांचे लेखापरीक्षण आयआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे दुरुस्ती व पुन्हा नवीन बांधण्याचा निर्णय घेतला जात आहे.नवीन जलकुंभांचे बांधकामही सुरूमहापालिका क्षेत्रामध्ये दोन जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. १९ जलकुंभांना महापालिकेने परवानगी दिली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. वाशी सेक्टर ५ मधील जलकुंभही धोकादायक घोषित केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु निविदेस अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.शहरातील सर्व जलकुंभांची नियमित देखभाल केली जात आहे. आवश्यकतेप्रमाणे जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले जात असते व येणाºया अहवालाप्रमाणे त्यावर उचित कार्यवाही करण्यात येते. धोकादायक ठरलेल्या जलकुंभांच्या ठिकाणी व मागणीप्रमाणे नवीन जलकुंभही उभारले जात आहेत.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता,नवी मुंबई महानगरपालिकावाशी परिसरातील धोकादायक जलकुंभांविषयी सर्वसाधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये वारंवार आवाज उठविला आहे. प्रशासनाने सर्वच जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे व धोकादायक जलकुंभाच्या ठिकाणी तत्काळ नवीन जलकुंभ उभारण्यात यावेत.- दिव्या गायकवाड, नगरसेविका, प्रभाग प्रभाग ६४अपघाताची शक्यताधोकादायक घोषित केलेल्या जलकुंभांपैकी काही जलकुंभांचा अद्याप वापर सुरू आहे. वेळेत नवीन जलकुंभ उभारण्याची कार्यवाही सुरू केली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील १८ जलकुंभांचा वापर बंद असून आतापर्यंत तीन जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई