शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

आयटीआयच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटींचा निधी, पुनर्विकास समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:28 AM

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देत असल्याची ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे महाराष्ट्र राज्य संचालक अनिल जाधव यांनी संघर्ष समितीसोबत गुरुवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली

पनवेल : पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देत असल्याची ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे महाराष्ट्र राज्य संचालक अनिल जाधव यांनी संघर्ष समितीसोबत गुरुवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली, तसेच आयटीआय पुनर्विकास संयुक्त समिती गठीत करण्यात आली.पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरवस्थेबाबत संघर्ष समिती गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्तरावर पाठपुरावा करीत आहे. संघर्षच्या विनंतीनुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे राज्य संचालक अनिल जाधव यांनी आज पनवेल आयटीआयमध्ये विशेष बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार दीपक आकडे, प्राचार्य बी. बी. फडतरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आर. एस. मोरे, उपप्राचार्य एम. बी. पिल्ले, एम. बी. शिंदे, एस. जे. पाटील, बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता एस. एस. डांगे तर संघर्षच्यावतीने अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, माधुरी गोसावी तसेच पराग बालड, उज्ज्वल पाटील, अ‍ॅड. किरण घरत, भारती जळगावकर, किरण तळेकर, मंगल भारवाड, चंद्रकांत शिर्के, रमेश फुलोरे, आनंद पाटील, शैलेश चौधरी, अमित चावळे, मनोहर देसाई, सुहास अनबोलकर, शैलेश पटेल आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते. संस्थेच्या सर्व इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्यासाठी राज्य शासनाच्या नियमांनुसार व्हिजेंटिया एजन्सीला कळविले आहे. त्यांची ‘फी’ असणारी साडेनऊ लाख रुपयांची रोकड त्यांना आजच अदा करण्यात यावी, असा अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा कांतीलाल कडू यांनी बैठकीत उचलून धरताच, संचालक जाधव यांनी तत्काळ मान्यता देवून ती रक्कम वळती करण्याचे आदेश प्राचार्य फडतरे यांना दिले आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याने आयटीआयच्या इमारतींच्या दुरुस्तीचा सुमारे दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. तो नाकारत संघर्ष समितीने सर्व इमारती नव्याने उभारण्यात याव्यात, अशी मागणी उचलून धरली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. अखेर संचालक जाधव यांनी अत्याधुनिक इमारत उभारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. तहसीलदार दीपक आकडे यांनीही दूरदृष्टिकोन ठेवून पनवेलच्या वैभवात भर घालणारी इमारत उभारली जावी, असे मत व्यक्त केले. तसा प्रस्ताव आर. एस. मोरे यांनी येत्या पंधरा दिवसांत सादर करावा, असे ठरले. त्याला मोरे यांनी सहमती दर्शविली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई