उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत

By Admin | Updated: January 20, 2015 02:05 IST2015-01-20T02:05:58+5:302015-01-20T02:05:58+5:30

रविवारी पोलीस आणि कंटेनर चालकांमध्ये पेटलेल्या दंगलीप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी २५ चालक क्लीनर्सना अटक केली आहे.

25 accused in the riots case | उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत

उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत

उरण : रविवारी पोलीस आणि कंटेनर चालकांमध्ये पेटलेल्या दंगलीप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी २५ चालक क्लीनर्सना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी न्हावा-शेवा पोलिसांनी करळ ते जीटीआय, जेएनपीटी, डीपी. वर्ल्ड या तिन्ही बंदरांकडे जाणारी वाहने हटवून कंटेनर वाहतूक सुरळीत केली. ही माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
ट्रेलरचालक आणि न्हावा-शेवा पोलीस यांच्यात रविवारी पेटलेल्या संघर्षामुळे दंगल माजली होती. या दंगलीत पोलिसांची जीप आणि चौकीला संतप्त जमावाने आग लावली. त्यांच्याविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्ट युजर्स बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे. ट्रेलरच्या मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदराचे एसीपी शशिकांत बोराटे यांनी दिली.

२५ जणांना अटक
याप्रकरणी उपनिरिक्षक आर. एस. संदानशिव यांनी फिर्याद नोंदवून दंगलीत १७ लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी मोहंमद इकरार अब्दील कुडूस, नरससिंग रामस्वरूप, बिट्टू दास, इरफान अली महमद अन्सारी, संजयकुमार श्रीराम सिंग, अजयकुमार प्रजापती, हेमंतकुमार राजभर, जितेंद्र कोडग, अनिल यादव, दुर्गाप्रसाद यादव, राहुल यादव, साईनाथ गोरडवार, अमरजित यादव, तानाजी नरळे, महंमद तोहीर मोहंमद तय्यब, राधेश्याम यादव, रामसिंग गौड, कबीरसेन गिर, विनोद यादव, विकास परदेशी, रामचंद्र रेडेकर, खालीद शकील अहमद, नरेंद्रसिंग दशरथसिंग, अनंतसिंग संतोषसिंग, राजकरणसिंग वीरेनसिंग आदी २५ चालक, क्लीनरना अटक केली आहे.

Web Title: 25 accused in the riots case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.