वाळीतप्रकरणी 23 जणांवर गुन्हा
By Admin | Updated: November 13, 2014 01:43 IST2014-11-13T01:43:07+5:302014-11-13T01:43:07+5:30
म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील स्थानिक व मुंबईतील कुणबी मंडळांच्या गावपंचानी दंडेलशाहीच्या जोरावर ग्रामस्थांवर दबाव आणून, गावातील संदेश रामजी शिगवण कुटूंबाला वाळीत टाकले होते.

वाळीतप्रकरणी 23 जणांवर गुन्हा
अलिबाग : म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील स्थानिक व मुंबईतील कुणबी मंडळांच्या गावपंचानी दंडेलशाहीच्या जोरावर ग्रामस्थांवर दबाव आणून, गावातील संदेश रामजी शिगवण कुटूंबाला वाळीत टाकले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच, रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी म्हसळा पोलीसांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी सावंत यांनी या प्रकरणी कोंझरी गावच्या मुंबईतील मंडळाचे अध्यक्ष सदानंद धोंडू शिगवण, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शांताराम निगुरडा यांच्यासह एकूण 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विविध आठ कलमांनुसार 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात कोंझरी गावकीचे अध्यक्ष सुधाकर देवजी कापेकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सदानंद धोंडू शिगवण, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शांताराम निगुरडा, योगेश पामजी काप, शंकर गणपत धाडवे, अनिल गंगाराम खेरटकर, सहदेव दौलत धाडवे,रमेश सहदेव धाडवे,सुरेंद्र धोंडू शिगवण,शंकर पामजी खेरटकर, अजय रतन धाडवे, मनोज शिवराम काप, शैलेश शिवराम धाडवे,संतोष लक्ष्मण शिगवण, विवेक मनोज काप,साहिल दिलीप शिगवण, अनंत रामचंद्र शिगवण, प्रविण गणपत खेरटकर, अनिकेत वसंत खेरटकर आणि लिलावती गुणाजी शिगवण यांचा समावेश असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)