शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

By नारायण जाधव | Updated: December 27, 2023 19:03 IST

फसवणूक झालेल्या महिलेने २०१७ मध्ये भूपेशबाबू यांच्या एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते.

नवी मुंबई : दिल्लीतील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची एन. के. कॅस्टलचे विकासक निलिपारंबिल कराप्पन भूपेशबाबू याने २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल पोलिसांत दाखल झाला आहे.फसवणूक झालेल्या महिलेने २०१७ मध्ये भूपेशबाबू यांच्या एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते. ही रक्कम एकरकमी अनामत ठेव म्हणून ठेवून त्यावर १६ टक्के व्याज मिळणार असे सांगण्यात आले होते. व्याजासह या रकमेचा परतावा ३१ मार्च २०१८ पर्यंत देऊ असेही सांगितले होते. या व्यवहारात तारण म्हणून एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पातील बालसम इमारतीमधील ४०८ चौरस फुटांची सदनिका ज्याची किंमत १८ लाख २५ हजार रुपये आहे, हे निश्चित झाले होते. याबाबतचा सामंजस्य करार दोघांत झाला होता.परताव्याची रक्कम आणि ठरलेल्या व्याजाची रक्कम न दिल्याने सदर महिलेने वारंवार फोनवरुन संपर्क साधूनही भूपेषबाबू यांनी टाळाटाळ केल्याचे दिलेल्या फौजदारी तक्रारीत महिलेने म्हटले आहे. अखेर संशय बळावल्याने त्यांच्या गृहप्रकल्पाची माहिती घेतल्यावर त्याला शासनाची अधिकृत परवानगी नसल्याचे समजले. तसेच भूपेशबाबू यांच्याकडे भारतीय रिझर्व बँकेकडील गुंतवणूक स्वीकारण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समजल्यावर सदर महिलेने पोलिसांत तक्रार केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस