2,100 शिक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 19, 2014 01:20 IST2014-10-19T01:20:07+5:302014-10-19T01:20:07+5:30
दिवाळीच्या दिवसात सर्वाना वेध लागतात ते नवीन कपडे, आणि गोडाधोडाचे. मात्र, आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे.

2,100 शिक्षकांची दिवाळी अंधारात
दिलीप घुडे - किन्हवली
दिवाळीच्या दिवसात सर्वाना वेध लागतात ते नवीन कपडे, आणि गोडाधोडाचे. मात्र, आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. तरीही सप्टेंबर महिन्याचा पगार, चार महिन्याचा फरक व दरवर्षी दिला जाणारा दिवाळी अग्रीम आणि ऑक्टोबरचा दिवाळी पुर्वीचा पगार झाला नसल्याने शिक्षकांची दिवाळी अंधारातच जाण्याची चिन्ह दिसत आहेत. पगार झाला नाही तर जिल्हा परीषद मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालया समोर मेणबत्ती मोर्चाचा इशारा स्वाभिमान शिक्षक संघटनेने दिला आहे.
मुरबाड तालुक्यातील 352 जि.प. शाळातील 84क् शिक्षक व शहापूर तालुक्यातील 468 शाळातील 1263 शिक्षकांना ऐन दिवाळीत सप्टेंबरचा पगार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांचा महागाई भत्ता फरक व ऑक्टोबर महिन्याचा दिवाळी पूर्वीचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा न झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय अशी चिंता असून शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच कर्मचा:यांचा पगार करण्याच्या वल्गना म्हणजे कर्मचा:यांची क्रूर चेष्टा आहे. आज पर्यंत शिक्षक कर्मचा:यांना 5 तारखेच्या आत पगार मिळालाच नाही. गेल्या 4 महिन्यांत तर पगार 1क् ते 15 तारखेच्या आसपासच जमा झाला आहे. राष्ट्रीय काम म्हणून प्रामाणकिपणो निवडणुकीची कामे करणा:या शिक्षकांना सप्टेंबरचा पगार ऑक्टोबर महिन्याची तारीख आली तरी मिळाला नाही. 21 तारखेपासून दिवाळी सुरू होत आहे म्हणून ऑक्टोबर महिन्याचा पगारही याच महिन्यात दिवाळीपूर्वी करण्याची घोषणा केली होती. परंतु, दिवाळी आली तरीही पगार न झाल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाकी सर्व कर्मचा:यांचे पगार 5 तारखेपूर्वी होतात मग शिक्षकांचे पगारच उशिरा का ? दिवाळी पूर्वीच्या पगारासाठी जि.प. लेखापाल म्हणतात की, तरतूद नाही. मग शिक्षकांच्या मुलाबाळांनी दिवाळी साजरी करायची नाही का?
- काशिनाथ भोईर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघ.
सप्टेबरच्या पगाराचे चेक मिळाले आहेत ते जमा केले की पगार होतील. ऑक्टोबरचा पगारही दिवाळी पूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. नक्की मी काही सांगू शकत नाही.
- केंद्रप्रमुख
मागील महिन्याचा पगार अजूनही खात्यात जमा नाही. ऑक्टोबरचा मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
- अनिल वरकुटे, शिक्षक