नेरुळ येथील दुर्घटनेत २ ठार, २ गंभीर जखमी; तिघांना सुखरुप वाचवण्यात यश
By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 23:09 IST2023-08-23T23:08:52+5:302023-08-23T23:09:02+5:30
या वजनाने सलग तीन मजल्याचे स्लॅब तळमजल्यावरील दुकानापर्यंत खाली कोसळले.

नेरुळ येथील दुर्घटनेत २ ठार, २ गंभीर जखमी; तिघांना सुखरुप वाचवण्यात यश
नवी मुंबई: नेरूळ सेक्टर 6 मधील तुलसी भवन इमारतीचे तीन स्लॅब रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन गंभीर जखमी झाले असून तीन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.अग्निशमन दल, मनपा आपत्कालीन विभागाच्या पथकाने ढिगारे उपसत आहेत. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सारसोळे दर्शन दरबार जवळ तुलसी भवन इमारत आहे. सव्वानऊ च्या सुमारास इमारतीच्या तीस-या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला.या वजनाने सलग तीन मजल्याचे स्लॅब तळमजल्यावरील दुकानापर्यंत खाली कोसळले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.अग्निशमन दल, मनपाचे आपत्कालीन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहचले. ढिगा-याखाली अडकून दोन पुरूषांचा मृत्यू झाला अहे. एक महिला व पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. दोन महिला व एक मुलगीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.मनपा आयुक्त राजेश नार्वेकर,आपत्कालीन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे घटनास्थळी पोहचले आहेत.
दुर्घटनेच्या ठिकाणी चिंचोळा रस्ता असून नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.