शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थी वंचित; आरटीई प्रवेशाकडे ८३५ विद्यार्थ्यांची पाठ, दोन हजार जागांसाठी १७ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:25 IST

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. (RTE admission)

योगेश पिंगळे -नवी मुंबई : आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरटीई योजनेचा लाभ घेण्यासाठी या वर्षी नवी मुंबई शहरात दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले होते, परंतु प्रवेश निश्चित झालेल्या ८३५ विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली आहे.

सर्वच स्तरांतील पालक या प्रकियेत सहभागी होत असल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी या लाभापासून वंचित राहत आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार, सर्वच शाळांमध्ये आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी विलंबाने सुरू झाली. नवी मुंबईत दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले. ८३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही.

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ आवश्यक आहे, असे गरीब घरातील विद्यार्थी मात्र वंचित राहात आहेत.

तक्रार क्रमांक 1 -लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर, अनेक विद्यार्थी मूळगावी गेले होते. ते अद्याप परतलेले नाहीत, त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतलेले नाहीत.

तक्रार क्रमांक 2 -आरटीई प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार का? या भीतीने पालकांनी आपल्या पाल्यांचे इतर शाळांमध्ये प्रवेश घेतले. त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतले नाहीत.

शासनाने मुदत वाढवली -आरटीईअंतर्गत प्रवेश निश्चित झालेले पालक आणि विद्यार्थी गावी असल्याने, ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तसेच या वर्षी शासनाच्या माध्यमातून मुदत वाढवली होती.- योगेश कडुसकर (उपायुक्त, शिक्षण विभाग, न.मुं.म.पा.)

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा