घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त

By Admin | Updated: December 14, 2015 02:21 IST2015-12-14T02:21:47+5:302015-12-14T02:21:47+5:30

घरगुती सिलिंडरचे गोदाम फोडून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे.

152 cylinders of domestic and commercial use seized | घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त

घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त

ठाणे : घरगुती सिलिंडरचे गोदाम फोडून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५२ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या टोळीकडून सिलिंडर विकत घेणाऱ्या चारजणांनाही पोलिसांनी जेरबंद केले.
कल्याणच्या तळोजा रोडवरील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गोदाम सिलिंडरची चोरी प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरात अशाच प्रकारची टोळी मुंब्रा रेल्वे स्थानक भागात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती.
जलाल युसुफ खान उर्फ लम्बू (४५) रा. अंबरनाथ, झहीर बाबर खान उर्फ राजू (३२)रा. डायघर, ठाणे, सईद अहमद उर्फ सोनू शरीफ खान (१९) रा. खारेगाव, ठाणे आणि राजेश रामचंद्र धनवडे (२८) रा. अंबरनाथ यांना ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे १५२ सिलिंडर, तसेच चोरी करताना वापरलेली गाडी असा सहा लाख ४४ हजार ६७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचे सिलिंडर विकत घेणाऱ्या अतिक अहमद मोहमद अस्लम अन्सारी, सुधाकर नाडर, अब्दुल मेहबूब मोहमद खलील चौधरी आणि धर्मेंद्र हरीराम अग्रहरी यांनाही अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 152 cylinders of domestic and commercial use seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.