टेम्पो अपघातात १४ जण जखमी
By Admin | Updated: May 12, 2014 06:05 IST2014-05-12T06:05:02+5:302014-05-12T06:05:02+5:30
सुधागड तालुक्यातील गोंडाळे या गावाहून पालीकडे येणारा छोटा टेम्पो एका वळणावर पुलावरून खाली पडला

टेम्पो अपघातात १४ जण जखमी
पाली : सुधागड तालुक्यातील गोंडाळे या गावाहून पालीकडे येणारा छोटा टेम्पो एका वळणावर पुलावरून खाली पडला. या अपघातात बेन्जो पथकाचे वाजंत्री वाजविणारे चौदा जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पाली येथील भक्त निवासात होणार्या विवाहाकरिता हे बेन्जो पथक सकाळी गोंडाळे येथून (एमएच०४ एफयू ९२४७ ) या छोट्या टेम्पोतून निघाले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शरदवाडी व गोकुळवाडी या गावांच्या दरम्यान एका वळणावर समोरून येणार्या दुचाकीला वाचविताना टेम्पोच्या चालकाचा गाडीवरून ताबा सुटला व पुलाखाली टेम्पो पडून अपघात झाला. या अपघातात राजू गणपत वाक (४०), पांडू ताया शिद, विठ्ठल मारूती मेंगाळ, विनायक तानाजी फसाळे आणि यशवंत महादू मांगळे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व राहणार भावशेत येथील रहिवासी होते. पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. यात चैतन्य वाक (१८), गोविंद वाक (३०), लक्ष्मण वाक (२६), जयराम शिद (३२), नवनाथ मेंगाळ (१९), रामदास वाक (१८), महेश वाक (२२) हे सर्व भावशेत येथील रहिवासी तर संजय शिंदे (१७), अनिल वारगुडे (२०) हे सुकेळी येथील राहणारे जखमी झाले आहेत. पाली येथील प्राथमिक आरोग्य कें द्रात उपचार केले. वाहन चालक गजानन सोनावणे (४०) रा. गोरेगाव मुंबई याला इजा झाली नाही. (वार्ताहर)