१२५0 कर्मचाऱ्यांचा लागणार फौजफाटा
By Admin | Updated: May 1, 2016 02:41 IST2016-05-01T02:41:10+5:302016-05-01T02:41:10+5:30
प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला

१२५0 कर्मचाऱ्यांचा लागणार फौजफाटा
- प्रशांत शेडगे, पनवेल
प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला प्राप्त होणाऱ्या वर्गवारीच्या अनुषंगाने हे मनुष्यबळ प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडे असलेले विद्यमान मनुष्यबळ विचारात घेवूनआवश्यक असणारा नवीन कर्मचारी वर्ग उपलब्ध केला जाणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे वारे जोरात वाहू लागले आहे. याबाबत अहवाल सुध्दा तयार असून अंतिम बैठकीनंतर ते शासनाला सादर करण्यात येणार आहे. लोकसंख्येनिहाय महानगरपालिकेचा दर्जा ठरवला जातो. २0११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता हा आकडा अधिक असला तरी त्यावेळी किती लोकवस्ती होती हा आकडा विचार घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महानगरपालिका ड वर्गात मोडणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या वर्गवारी नुसार संबधित महापालिकेत किती मनुष्यबळ असावे याचे निकष ठरले आहेत. त्यानुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे.
सिडको नोडमध्ये रस्ते, उद्याने व इतर पायाभूत सुविधांचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. परंतु पनवेल शहराचा मात्र म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर काही मोठे प्रकल्प हाती घेण्याचे या अभ्यास समितीने सुचित केले आहे. तक्का, मार्केट यार्ड आणि हरीओम नगर या परिसरात तीन मोठे उद्याने विकासीत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अंतर्गत रस्ते, पार्किंग, सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची व्यवस्था आगोदरच आहे. प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्यासंदर्भात या अहवालात मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत.
परिवहन सेवेला मिळणार चालणा
पनवेल शहरात रिंगरूट बससेवा करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलबिंत आहे. त्यासाठी ५७ कोटी रूपयांचा ढोबळ खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु पनवेल नगरपालिकेला हा खर्च न झेपणारा असल्याने हा प्रस्तावत काहीसा रखडला होता. असे असले तरी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर परिवहन सेवेला चालणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.