पोलीस भरतीसाठी १२,२०० उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: February 21, 2016 02:35 IST2016-02-21T02:35:25+5:302016-02-21T02:35:25+5:30

पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने

12,200 nomination papers for recruitment of police | पोलीस भरतीसाठी १२,२०० उमेदवारी अर्ज

पोलीस भरतीसाठी १२,२०० उमेदवारी अर्ज

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने त्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी ७८ व कारागृह शिपाई पदासाठी १२ अशा एकूण ९० जागांसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात भरती प्रक्रिया होत आहे. राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयांसह नवी मुंबई आयुक्तालयात रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता अधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार ४ मार्चपर्यंत इच्छुकांना पोलीस भरतीसाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान नवी मुंबई आयुक्तालयामार्फत ९० जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी शनिवार सकाळपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाल्याचे प्रशासन उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. तर मुदत वाढल्याने अर्जांच्या संख्येत अधिक वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा तोंडी परीक्षा होणार नसून केवळ मैदाणी आणि लेखी परीक्षाच उमेदवारांना द्यावी लागणार आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांची शारीरिक चाचणी कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. पुरुषांसाठी १,६०० मीटर व महिलांसाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी खारघरच्या सेंट्रल पार्कलगतच्या रस्त्यावर होणार असल्याचेही उपायुक्त खैरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 12,200 nomination papers for recruitment of police