रक्तदानात १२०५ जण सहभागी

By Admin | Updated: September 12, 2016 03:28 IST2016-09-12T03:28:04+5:302016-09-12T03:28:04+5:30

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ब्लड डोनर चेनचा शुभरंभ करण्यात आला आहे.

1205 participants in blood donation | रक्तदानात १२०५ जण सहभागी

रक्तदानात १२०५ जण सहभागी

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ब्लड डोनर चेनचा शुभरंभ करण्यात आला आहे. रविवारी माजी गणेश नाईक यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. पहिल्या दिवशी महाशिबिरात १२0५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तर एकूण ११00 रक्तबाटल्या संकलीत करण्यात आल्या.
समाजातील गरजू व दिव्यांग व्यक्तिींसाठी या रस्ताचा उपयोग होईल. गरजूंना वेळेत रक्त पुरवठा करणे हा या उपक्रमा मागचा मुख्य हेतू असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिसांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक सुरज पाटील आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक कोंडीबा तिकोणे यांनी दिलेल्या रूग्णवाहिकेचे यावेळी लोकार्पण करण्यात आले.

Web Title: 1205 participants in blood donation