12 municipal employees fined, plastic ban campaign | पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना दंड, प्लास्टिकबंदी मोहीम
पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना दंड, प्लास्टिकबंदी मोहीम

कळंबोली : शासनाने प्लास्टिक बंदी केल्यामुळे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मोहीम राबवून दुकानदार तसेच प्लास्टिक वापर करणाºया रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. महापालिकेने प्लास्टिकचा वापर करणाºया १२ कर्मचाºयांवरही कारवाई करीत १८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शासनाकडून प्लास्टिकबंदी झाल्याने पनवेल महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात याबाबत जनजागृती करूनही वापर करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम पा़लिका क्षेत्रात अधिक तीव्र करून प्लास्टिक वापर कमी केलेला दिसून येत आहे. याची सुरुवात महापालिकेने स्वत:पासूनच केली आहे. महापालिकेत बांधकाम, लेखा विभाग, करवसुली, सामान्य प्रशासन, परवानगी विभाग, अग्निशमन, नगररचना विभाग, पाणीपुरवठा असे जवळपास दहा विभागातील ६०० कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कर्मचाºयांकडून महापालिकेचा कारभार चालवला जातो. यात दररोज पाण्याची प्लास्टिक बॉटल, कॅरी बॅग, पाय ठेवण्याकरिता थर्माकोल अशा बंदी असलेल्या वस्तूंचा वापर करणाºया १२ कर्मचाºयांवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
प्लास्टिकबंदी झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार महापालिकेतील कर्मचाºयांना प्लास्टिकबंदीची नोटीस देण्यात आली होती. शिस्तभंग केल्यामुळे १२ कर्मचाºयांना दंडात्मक कारवाईकरिता सामोरे जावे लागले. कर्मचाºयांकडून जवळपास १८०० रुपयांचा दंड आकारल्याचे आरोग्य विभागाकडून ‘लोकमत’ला सांगितले.
>कारवाईनंतर स्टील व काचेच्या वस्तूंचा वापर
कारवाईच्या भीतीपोटी महापालिकेतील कर्मचारी पाणी वापराकरिता स्टीलचे तांबे तसेच पाणी घेण्याकरिता स्टीलचा पेला वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर काचेच्या ग्लासचाही पाणी पिण्याकरिता वापर केला जात आहे.
>महापालिका क्षेत्रातील सर्वच परिसरात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर या मोहिमेत आमच्यापासूनच आम्ही सुरुवात केली आहे. याबाबत कर्मचारी यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार शिस्तभंग केल्याप्रकरणी आम्ही १२ कर्मचाºयावर दंडात्मक कारवाई केली आहे.
- मधुप्रिया आवटे,
घनकचरा व्यवस्थापन अधिकारी

Web Title: 12 municipal employees fined, plastic ban campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.