शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

‘त्या’ ११९ इमारतींना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 5:58 AM

इमारती सीआरझेड-२ मध्ये येत असल्याचे कारण देत, महापालिकेने त्यांना भोगवटा प्रमाणपत्र नाकारले आहे. त्यामुळे या इमारती कायदेशीररीत्या अनधिकृत ठरल्या आहेत; परंतु केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून अलीकडेच राज्य पर्यावरण विभागाला एका प्रकरणात मिळालेल्या निर्देशानुसार या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

ठळक मुद्देसीआरझेड क्लिअरन्स दृष्टिपथात केंद्रीय पर्यावरण विभागाची सकारात्मक कार्यवाही

कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सीआरझेड-२ क्षेत्रात समावेश झालेल्या शहरातील ‘त्या’ ११९ इमारतींतील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या इमारती सीआरझेड-२ मध्ये येत असल्याचे कारण देत, महापालिकेने त्यांना भोगवटा प्रमाणपत्र नाकारले आहे. त्यामुळे या इमारती कायदेशीररीत्या अनधिकृत ठरल्या आहेत; परंतु केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून अलीकडेच राज्य पर्यावरण विभागाला एका प्रकरणात मिळालेल्या निर्देशानुसार या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सिडकोने पामबीच मार्गावर निविदा काढून विकासकांना भूखंड दिले. या भूखंडांच्या विकासासाठी महापालिकेने नियमानुसार बांधकाम परवानगीही दिली. सध्या या इमारती बांधून पूर्ण झाल्या असून, त्यांचा रहिवासी निवासी वापर सुरू आहे. असे असले तरी २0११मध्ये सीआरझेड कायद्यात सुधारणा करून सागरी किनार्‍याची र्मयादा वाढविल्याने या इमारती सीआरझेडच्या कात्रीत अडकल्या. त्यामुळे महापालिकेने या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दर्शविला. शहरात अशा प्रकारच्या ११९ इमारती असून, त्यांना सीआरझेड-२ मधून वगळावे, यासाठी संबंधित विकासकांचा पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांना आता यश मिळताना दिसत आहे. पामबीच मार्गावरील नेरुळ येथे मायकॉनिक स्ट्रक्चर्स या इमारतीचा भूखंड सीआरझेड क्षेत्रात मोडत नसल्याचे भारत सरकारच्या मीनिस्ट्री ऑफ एनव्हार्मेंट व फॉरेस्ट विभागाने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या सचिवांना कळविले आहे. त्यामुळे सदर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याचा फायदा सीआरझेड-२च्या फेर्‍यात अडकलेल्या उर्वरित इमारतींना होणार आहे. पर्यावरण अधिनियम १८५६ नुसार सिडकोने १९ फेब्रुवारी १९९१ रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये नवी मुंबई क्षेत्रातील समुद्राची उच्चतम भरती रेषा अर्थात हाय टाइड लाइन (एचटीएल) जाहीर केली होती. त्यानंतर पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली. या पामबीच मार्गाची पश्‍चिमेकडील बाजू खारफुटी व सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत.  तर या मार्गाच्या अलीकडील बाजूस मात्र सिडकोने निविदा काढून भूखंडांची विक्र ी करून करोडो रुपये कमविले. त्या भूखंडावर बांधकाम परवानगी देऊन नवी मुंबई महापालिकेने विकास शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले, असे असताना अचानक सदर भूखंड सीआरझेड क्षेत्र-२मध्ये मोडत असल्याचे कारण सांगत, ११९ इमारतींना नोटिसा बजावून महापालिकेने विकासकांच्या मानगुटीवर एमसीझेडएमएचे भूत बसवून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. याबाबतची खरी परिस्थिती वारंवार राज्याच्या पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील पर्यावरण विभागाने अद्याप सीआरझेड क्लिअरन्स दिलेला नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण विभागाने राज्य पर्यावरण विभागाला दिलेल्या निर्देशामुळे त्या ११९ इमारतींच्या विकासकांना व त्यात राहणार्‍या रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.