नवी मुंबईतील ११ दुचाकी यवतमाळमधून जप्त
By Admin | Updated: June 30, 2017 01:24 IST2017-06-30T01:24:48+5:302017-06-30T01:24:48+5:30
नवी मुंबईच्या वाशी परिसरातून चोरलेल्या ११ दुचाकी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथून जप्त केल्या. ही कारवाई वाशी पोलिसांनी केली

नवी मुंबईतील ११ दुचाकी यवतमाळमधून जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा (यवतमाळ) : नवी मुंबईच्या वाशी परिसरातून चोरलेल्या ११ दुचाकी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथून जप्त केल्या. ही कारवाई वाशी पोलिसांनी केली असून, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अनिल रुडे (२३) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नवी मुंबई वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपासून दुचाकी चोरीत वाढ झाली होती. वाशी एपीएमसी ठाण्यात जवळपास १० दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही वाहने यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड गाठले. तेथे या दुचाकी आढळल्या. एकूण ११ दुचाकी पोलिसांनी जप्त करून अनिल रुडे याला अटक केली.