शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

पनवेलमधून १०० किलो गांजा जप्त,  तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:58 AM

पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते.

नवी मुंबई : पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते.पनवेल-मुंब्रा मार्गावर कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा नेला जाणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किरण राऊत यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार अनिल यादव, सतीश सरफरे, सागर कांबळे, किरण राऊत यांच्या पथकाने धरणा गावाजवळील टोलनाक्यावर सापळा रचला होता. यावेळी स्कोडा कार (एमएच ०२ जेपी ९४३०) अडवून पोलिसांनी झडती घेतली असता कारच्या डिकीमध्ये गोणीत भरलेला गांजा आढळून आला. याप्रकरणी कारमधील अमीर अहमद (३२), सिराज अहमद चौधरी (२३) व मोहमद उस्मान सिध्दीकी (३८) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच १०० किलो गांजासह स्कोडा कार देखील जप्त करण्यात आली आहे.शहरात गांजा विक्रेते मोकाट असल्याने त्याच्या आहारी जाणाºयांचीही संख्या वाढू लागली आहे. गांजा विक्रेत्यांचे जाळे राज्यभर पसरले असून त्याचे सूत्रधार राज्याबाहेरचे असल्याचे समोर येत आहे. मुंब्रा मार्गावर पकडलेला गांजा देखील आंध्र प्रदेशमधून आणण्यात आलेला होता. तो पकडला जावू नये याकरिता महागड्या स्कोडा कारमधून त्याची वाहतूक केली जात होती. मात्र गुन्हे शाखा पोलिसांना त्याची खबर मिळाल्याने सापळा रचून कारवाई केली. आरोपींना न्यायालयाने गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :panvelपनवेल