आगीत १० मोटारसायकली खाक
By Admin | Updated: November 14, 2015 03:35 IST2015-11-14T03:35:25+5:302015-11-14T03:35:25+5:30
शुक्रवारी सायकांळी कॅम्प नं़ १ बिर्ला गेट नगरसेविका ज्योती गायकवाड यांच्या घरामागील व कमल लॉजशेजारील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानासह

आगीत १० मोटारसायकली खाक
उल्हासनगर : शुक्रवारी सायकांळी कॅम्प नं़ १ बिर्ला गेट नगरसेविका ज्योती गायकवाड यांच्या घरामागील व कमल लॉजशेजारील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानासह पार्किंगमध्ये ठेवलेल्या १० मोटारसायकली खाक झाल्या
आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत
चोपडा कोर्ट परिसरातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली होती.
उल्हासनगरातील रहिवासी भागात फटाक्याचे गोदामे असल्याचे पोलीस उपायुक्तासह स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिकेला दिवाळीपूर्वी निर्देशनात आणून दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केल्याचा कांगावा केला. नगरसेविका गायकवाड यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन केल्यावर त्यांनी येऊन आग आटोक्यात आणली.
शहरातील विविध फटाक्यांच्या दुकानांत क्षमतेपेक्षा दहापट जादा फटाके ठेवले असून, त्यांची गोदामे विनापरवाना रहिवासी भागात आहेत. गोदामाला पालिकेसह पोलीस व संबंधितांनी परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.