शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

१ कोटी ४२ लाखाचा ऐवज केला परत, पोलिसांच्या रुपाने ७० कुटुंबांना गणराय पावला

By नामदेव मोरे | Updated: August 30, 2022 18:28 IST

नवी मुंबई परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना प्रतिदिन घडत आहेत.

नवी मुंबई : परिमंडळ १ परिसरात चोरीला गेलेले दागिने व वाहने पोलिसांनी नागरिकांना परत केली.१० पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ७० फिर्यादीना तब्बल १ कोटी ४२ लाख रुपयांचे दागिने, वाहने व रोख रक्कम परत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर चोरी गेलेला ऐवज मिळाल्याने नागरिकांनी समधान व्यक्त केले आहे.

नवी मुंबई परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना प्रतिदिन घडत आहेत. आयुष्यभर बचत करून साठविलेले दागिने, वाहने चोरीला गेल्यामुळे नागरिकांना धक्का बसत असतो. चोरी गेलेला माल परत मिळेलच याची शाश्वती नागरिकांना नसते. परंतु मागील काही वर्षात नवी मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेला माल सार्वजनीक कार्यक्रम घेऊन सन्मानाने नागरिकांना परत करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी परिमंडळ एक च्या वतीने वाशी मधील साहित्य संस्कृती मंडळाच्या सभागृहात नागरिकांना चोरी गेलेला त्यांचा ऐवज परत देण्यात आला. दहा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील २३ फिर्यादींना ८३ लाख १४ हजार ९४२ रुपयांचे दागिने व रोख रक्कम देण्यात आली. ४७ नागरिकांना ५९ लाख ७१ हजार रुपये किमतीची त्यांची वाहने परत देण्यात आली आहेत. एकूण ७० जणांना १ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये किमतीचे साहित्य परत करण्यात आले आहे.

चोरी गेलेले दागिने व वाहने परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी चोरी, घरफोडीसह इतर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही दक्ष राहून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जय कुमार,परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक पानसरे, साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी सुभाष कुळकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.परत केलेल्या साहित्याचा तपशील

पोलिस स्टेशन - फिर्यादी - परत केलेले दागिने - फिर्यादी - परत केली वाहेवाशी - ४ - ५५४३००० - ० - ०

एपीएमसी - ७ - १५५५९९० - ४ - १६५०००रबाळे - ० - ० - ५ - १३५०००

कोपरखैरणे - ४ - ४३५००० - २ - ९५०००रबाळे एमआयडीसी - २ - १५२००० - ५ - ३०६०००

तुर्भे - ० - ० - १३ - ४२०९५६१सानपाडा ० - ० - ४ - २३६०००

नेरूळ ४ - १९०००० : ६ - ५३००००एनआरआय - १ - १३८९५२ - ३ - ९००००

सीबीडी १ - २४०००० - ५ - २०५०००एकूण २३ - ८२४५९४२ - ४७ - ५९७१५६१ 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी