शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार : केंद्र सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 00:07 IST

Coronavirus Vaccine : केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती. Zydus Cadila लसीची वैद्यकीय चाचणी झाली पूर्ण.

ठळक मुद्दे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती.Zydus Cadila लसीची वैद्यकीय चाचणी झाली पूर्ण.

सध्या देशात १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. परंतु कोरोनाची महासाथीकडे पाहता मुलांचं लसीकरण केव्हा केला जाईल असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी लवकरच झायडस कॅडिलाच्या लसीला (Zydus Cadila Vaccine) मंजुरी देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. Zydus Cadila लसीचं १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांवरील वैद्यकीय चाचणी पूर्ण झालं आहे. भविष्यात ही लस १२ ते १८ या वयोगटातील मुलांसाठीही उपलब्ध होणार आहे. 

भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनची (Covaxin) २ ते १८ वर्षांवरील मुलांवर वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे. देशातील जवळपास ५४ टक्के जनता खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेते, तर ४५ टक्के जनता सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचंही सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

लसीकरण वेगानं इतिहासातलं सर्वात मोठी लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. तसंच दुरच्या प्रदेशांपर्यंतही ही मोहीम पोहोचली असल्याचं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं लसीकरणाच्या धोरणावर ३७५ पानांचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी १८६.६ कोटी डोसेसची आवश्यकता आहे जी जवळपास ९३-९४ कोटी आहे, २५ जूनपर्यंत देशात ३१ कोटी लसींचे डोस देण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. 

जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत भारतात ५१ कोटी डोस उपलब्ध होती. तसंच ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत १३५ कोटी लसींचे डोस उपलब्ध होती. यापैकी कोविशिल्डचे ५० कोटी, कोवॅक्सिनचे ४० कोटी, बायोलटजिकल ईचे ३० कोटी, झायडस कॅडिलाचे ५ कोटी आणि स्पुटनिक व्ही चे १० कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

दैनंदिन लसीकरणानुसार डोमेनवर आकडेवारीलसीकरणाची मोहीम वेगवान आहे. आता नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाच्या दैनंदिन आधारावर आकडेवारी डोमेनवर चाकण्यात येते. समाजातील आर्थिकरित्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी खासगी लसीकरण केद्रांवर जाणं सुलभ व्हावं यासाठी व्हाऊचर योजना तयार करण्यात आली आहे. एनजीओ हे व्हाऊचर्स घेऊन आर्थिकरित्या दुर्बल घटकांना देऊ शकतात आणि ते लोकं व्हाऊचर्स लसीकरण केंद्रांवर देऊ शकतात. COWIN प्लॅटफॉर्मवर नोंदणी आवश्यक नाही. ग्रामीण भागातील लोकांना जवळच्या केंद्रांवर जाऊनही लस घेता येणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

लसींचे दर निश्चितदेशातील ७४ टक्के लसी या ग्रामीण भागात आहेत. ७५ टक्के लसी केंद्र सरकारद्वारे मोफत दिल्या जात आहेत. तर २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. लसींच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठीही लसी लवकरच उपलब्ध होतील, असंही सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय