शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Zomato Controversy: झोमॅटोवरच्या क्षुल्लक वादाला सोशल मीडियावर 'जाती'वादाची फोडणी!

By वैभव देसाई | Updated: August 1, 2019 14:27 IST

सोशल मीडियावर झोमॅटो या प्रकरणावरून ट्रोल झाली असून, ट्विटरवरून त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे असे दोन गट पडले आहेत.

- वैभव देसाईमुंबई: डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं दिलेल्या सणसणीत प्रत्युत्तरानंतर या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावर झोमॅटो या प्रकरणावरून ट्रोल झाली असून, ट्विटरवरून त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्यावर टीका करणारे असे दोन गट पडले आहेत. डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारणाऱ्या ग्राहकाला सुनावल्यानंतर धर्माच्या नावाखाली भेदभाव न करणारी झोमॅटो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म' अशा शब्दांत झोमॅटोनं प्रत्युत्तर दिले होतं, त्यानंतर चक्क कंपनीचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांनीही ट्विटरवरून कंपनीची हीच अधिकृत भूमिका असल्याचं जाहीर केलं होतं. अनेकांनी झोमॅटोच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक केले होते. परंतु काही जणांनी कंपनीवर टीकाही केली आहे. श्रावण सुरू होत आहे. त्यामुळे मुस्लिम डिलीव्हरी बॉयकडून ऑर्डर स्वीकारू शकत नाही. मला पैसे परत नकोत, ऑर्डर रद्द करा,' असे ट्विट अमित शुक्ल याने मंगळवारी रात्री केले होते. आपल्याला एका मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ येणार असल्याचे समजताच त्याने ऑर्डर रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र 'झोमॅटो'ने 'रायडर' बदलण्यास स्पष्ट नकार दिला. 'झोमॅटो'चे संस्थापक गोयल यांनी 'भारत या संकल्पनेचा, ग्राहक अन् भागीदार यांच्या सौहार्दाच्या नात्याचा आम्हाला अभिमान आहे. तत्त्वांसाठी आम्ही व्यवसायाशी तडजोड करू शकत नाही, तसेच त्याचा आम्हाला खेद नाही,' असे ट्विट केले होते. संवाद व कंपनीची भूमिका व्हायरल होताच असंख्य धर्मनिरपेक्ष लोकांनी कंपनीच्या भूमिकेबद्दल आभारही मानले होते. त्यानंतर हा प्रकार काही तथाकथित हिंदूंनी उचलून धरला असून, झोमॅटो, स्विगी आणि उबर ईट्सला ट्रोल केलं जात आहे. झोमॅटोच्या भूमिकेला स्विगी अन् उबर ईट्सनं ट्विटरवरून पाठिंबा दर्शवला होता. त्यावरूनच त्यांना आता ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी झोमॅटो, स्विगी आणि उबर ईट्सवर अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे. हिंदूद्वेष्ट्या भूमिकेमुळे मी तुमचं अ‍ॅप काढूत टाकत असल्याचं नंदिनी या युजर्सनं म्हटलं आहे. अजय गुरजार या युजर्सनंही लोकांना झोमॅटो आणि स्विगीचे अ‍ॅप मोबाईलमधून काढून टाकण्याचं आवाहन केलं आहे. झोमॅटो अन् उबर ईट्सवर बहिष्कार घातल्यानं स्विगीवाले मजा घेत असल्याचं काहींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे त्या जेवणाची ऑर्डर नाकारणाऱ्या व्यक्तीचं ट्विटरवर नाव पंडित अमित शुक्ल असं असून, नमो_सरकार असे तो ट्विटर युजरनेम वापरतो. डिलीव्हरी नाकारणारा ग्राहक पंडित अमित शुक्ल याचेही काही वादग्रस्त ट्विट व्हायरल होत आहेत. त्यानं काही ट्विटमध्ये महिलांवर अश्लील टिपण्णी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तो एकंदरीतच कुठल्या मानसिकतेचा असावा, याचा अंदाज बांधणं फारसं कठीण नाही. तर काहींनी झोमॅटोच्या या भूमिकेचं समर्थन करत आभारही मानले आहेत.

यासंदर्भात झोमॅटो दुटप्पी भूमिका घेत असल्याचंही एक ट्विटही व्हायरल होत आहे. मुस्लिम व्यक्तीला गैर हलाल जेवण मिळाल्यानंतर तत्परतेनं त्याची दखल घेणारी झोमॅटो हिंदूंना धर्मनिरपेक्षतेची शिकवण देत असल्याचं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीतच हा वाद अनाकलनीय आहे. सामान्य माणसानं या वादात न पडता याकडे दुर्लक्ष करणं गजरेचं आहे. काही समाजकंटक समाजात तेढ पसरवण्याच्या हेतूनं या वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :ZomatoझोमॅटोIndiaभारत